Join us

प्रदेशाध्यक्षपद दिले तर आनंदाने स्वीकारू- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:42 AM

मुंबई : आपल्याला पक्षाने महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले तर आपण आनंदाने काम करू. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार ...

मुंबई : आपल्याला पक्षाने महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले तर आपण आनंदाने काम करू. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणे ही आपली भूमिका आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले.

नाना पटोले सध्या दिल्लीत आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी किंवा अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली नाही. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण येथे आलो नाही, किंवा आपल्याला बोलावले नाही, असे सांगून ते म्हणाले, मी माझ्या अन्य कामासाठी दिल्लीत आलो होतो. हा विषय कुठून सुरू झाला मला माहिती नाही. पण जर पक्षाने ही जबाबदारी दिली तर आपण निश्चितपणे पार पाडू असेही ते म्हणाले.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याशी कोणीही चर्चा केली नाही. किंवा विधानसभेचे अध्यक्षपद आपण घ्यावे असेही आपल्याला कोणी सांगितलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद हवे आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पद आहे. शिवाय दोन्ही सभागृहाचे ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेस