Devendra Fadnavis News माझ्यावर वेळ आली तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार; फडणवीसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 05:22 PM2024-07-24T17:22:34+5:302024-07-24T17:31:24+5:30

Devendra Fadnavis on Anil Deshmukh : श्याम मानव आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांना आता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.

I will make that audio video of Anil Deshmukh public bjp leader devendra Fadnavis warning | Devendra Fadnavis News माझ्यावर वेळ आली तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis News माझ्यावर वेळ आली तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis ( Marathi News ) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नुकतेच गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. "श्याम मानव हे मला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करण्याआधी त्यांनी मला विचारायला हवं होतं. मात्र एका इकोसिस्टममध्ये सुपारी घेऊन आरोप करणारे लोक आहेत. दुर्दैवाने श्याम मानव या लोकांच्या नादी लागल्याचं दिसत आहेत. अनिल देशमुख यांची चौकशी लागली तेव्हा राज्यात आमचं सरकार नव्हतं. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर अनिल देशमुख यांची चौकशी लागली आणि हायकोर्टाने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला लावला. महाविकास आघाडी सरकारमध्येच देशमुख यांच्याविरोधात एफआरआर झाला आणि ते तुरुंगात गेले. देशमुख हे निर्दोष म्हणून तुरुंगाबाहेर आले नसून ते जामिनावर बाहेर आहेत," असा पलटवार फडणवीसांनी केला आहे.

अनिल देशमुख यांना इशारा देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "मी एखाद्यावर राग ठेवून राजकारण करत नाही. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण माझ्या वाट्याला कोणी गेलं तर मी त्याला सोडत नाही. अनिल देशमुख यांच्या पक्षाच्याच काही लोकांनी मला ऑडिओ-व्हिडिओ आणून दिले आहेत. त्यात अनिल देशमुख हे उद्धव ठाकरेंबाबत काय बोललेत, शरद पवार यांच्याबाबत काय बोललेत, सचिन वाझेवर काय बोललेत, हे सगळं आहे. माझ्यावर वेळ आली के हे व्हिडिओ मी सार्वजनिक करणार आहे."

अनिल देशमुखांवर फडणवीसांचे प्रत्यारोप

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी बेकायदेशीर काम केल्याचा आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "सीबीआयने आता जी चार्जशीट तयार केली आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला होता. तसंच महाजन यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सांगितले होते. यासंदर्भातील ऑडिओ-व्हिडिओ पुरावे मी दिले होते. या पुराव्यांच्या आधारेच सीबीआयकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणात सीबीआयने पुराव्यांसहित कोर्टात चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांवर गुन्हे दाखल करणे, मोक्का लावणे यासंदर्भातील कट रचला जात होता, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे," असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे. 

श्याम मानव आणि अनिल देशमुखांनी काय आरोप केले होते?

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडकवण्यासाठी भाजपने गृहमंत्रिपदावर असलेल्या अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. मात्र देशमुख यांनी ती ऑफर न स्वीकारता १३ महिने तुरुंगात राहणं पसंत केलं," असा खळबळजनक दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. मानव यांच्या या दाव्याला अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे.

Web Title: I will make that audio video of Anil Deshmukh public bjp leader devendra Fadnavis warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.