Join us

Abdul Sattar: "आज मै कुछ भी नही बोलूंगा", अब्दुल सत्तारांनी मीडियाला बोलणं स्पष्टच टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 4:26 PM

विधानसभेत विधानसभा अध्यक्षांच्या मतदारासाठी सर्वच आमदार उपस्थि होते. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आज भाजपच्या उमेदवाराला मतदान केले.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी तब्बल 12 दिवसांनी मुंबईत पाऊल ठेवले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना गोव्याहून मुंबईला आणलं. मुंबई विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते हजर होते. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी आमदारांचं आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. भाजप नेते आणि बंडखोर आमदारांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी, अब्दुल सत्तारांचीही गळाभेट झाली. आमदार गिरीश महाजन हे अब्दुल सत्तारांना पाहून अतिशय आनंदी झाले होते. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज हे सर्व आमदार विधानसभेत पोहोचले. यावेळी, अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी घेराव घातला होता. 

विधानसभेत विधानसभा अध्यक्षांच्या मतदारासाठी सर्वच आमदार उपस्थि होते. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आज भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे, भाजप आमदार राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत. तत्पूर्वी भाजपच्या बंडखोर आमदारांनी विधानसभेत पोहोचताच माध्यमांनी या आमदारांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनाही मीडियाने घेराव घातला होता. तसेच, आपण उद्धव ठाकरेंची शिवसेना मानता का नाही, असा सवाल एका पत्रकाराने विचारला होता. त्यावेळी, आज मै कुछ भी नही बोलूंगा.... मी आज काहीही बोलणार नाही. उद्या बहुमत चाचणी झाल्यानंतरच मी प्रश्नांना उत्तरे देईल, असे म्हणत माध्यमांना बोलण्याचं टाळलं आणि सभागृहात निघून गेले. 

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आपण शिंदेगटात सामिल झाल्याचं म्हटल्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. तर, संजय राऊत यांनीही अब्दुल सत्तार हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन खरंच गुवाहटीला गेलेत, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली होती. 

अब्दूल सत्तार यांना जादू की झप्पी

मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलबाहेर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते येथे पोहोचले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, राम कदम हे शिवसेनेच्या आमदारांच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये प्रवेशद्वारावर उभे होते. यावेळी, प्रत्येक आमदाराचे हातात हात देऊन स्वागत होते होते. अब्दुल सत्तार यांना पाहून जळगावचे नेते आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांना आनंद झाला. त्यावेळी, गाववाल्या म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील यांना हाक मारुन त्यांनी अब्दुल सत्तारांचे स्वागत केले. सत्तार यांना जादू की झप्पी दिली, यावेळी उदय सामंत हेही त्यांच्यासमवेत होते. 

टॅग्स :शिवसेनाअब्दुल सत्तारमुंबई