‘मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन बाजू मांडणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:58 AM2020-07-11T06:58:49+5:302020-07-11T06:59:08+5:30

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

‘I will take the side of all sections of the Maratha community in faith’ | ‘मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन बाजू मांडणार’

‘मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन बाजू मांडणार’

Next

मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
उपसमितीने शुक्रवारी सायंकाळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. छत्रपती संभाजेराजे, आ. विनायक मेटे यांच्यासह समाजातील अनेक अभ्यासक, जाणकारांनी आपली भूमिका मांडली. समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार आणि शासनाचे संबंधित अधिकारी व वकील यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, विधीमंडळाने सर्व सहमतीने पारित केलेले मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी असल्याचे चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले.
समितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनीही याप्रसंगी आपली भूमिका मांडली. समाजाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी सरकार कोणतीही कसूर ठेवणार नाही, असे आश्वासन दिले.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य यापुढेही घेतले जाईल. तर, थोरात यांनी बैठकीतून अनेक चांगले मुद्दे समोर आल्याचे स्पष्ट केले. या मुद्यांवरील एकजूट पाहता मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्चित कायम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: ‘I will take the side of all sections of the Maratha community in faith’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.