"एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिगत जीवनासाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:06 PM2023-07-13T13:06:30+5:302023-07-13T13:07:00+5:30

एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय देण्याचं मान्य केलं. त्यानुसार, ते दिव्यांग मंत्रालय दिलं

"I will work as a slave to Eknath Shinde for his personal life.", Bachhu kadu on CM Shinde of divyang mantralay | "एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिगत जीवनासाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेल"

"एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिगत जीवनासाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेल"

googlenewsNext

मुंबई - माजी मंत्री आणि शिंदे गटातील अपक्ष आमदारबच्चू कडू यांनी आज आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, सकाळी ११ वाजता आमदार कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काही गोष्टींचा उलगडा केला. दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यामुळे मी समाधानी आहे. मी वैयक्तिक कारणासाठी नाराज कधीच होणर नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं. त्यांच्या या निर्णयामुळे मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहिले. एकनाथ शिंदेंच्या वयक्तिक जीनवासाठी मी सदैव त्यांचा गुलाम म्हणून काम करेल, असे बच्चू कडूंनी म्हटले. 

एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय देण्याचं मान्य केलं. त्यानुसार, ते दिव्यांग मंत्रालय दिलं. माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी घटना किंवा सर्वात मोठं पद आहे. माझ्या बंडामुळे किंवा मी गुवाहटी जाण्यामुळे या देशात पहिल्यांदाच दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा त्याबद्दल मी आभारी आहे, त्याचा आयुष्यभर ऋणी राहिल. त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी, व्यक्तीगत पदासाठी मी त्यांचा सदैव गुलाम म्हणून काम करेल, त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दलची व्यक्तिगत आपुलकी बोलून दाखवली.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमचं काम केलं. एका वीरचक्र प्राप्त सैनिकाला तिरंग्यात घ्यायचं होतं, त्यांनी एका फोनवर ते काम केलं. दिव्यांगासाठी त्यांनी ४ जीआर काढले, म्हणून त्यांचही मी आभार मानतो, असे म्हणत बच्चू कडू यांनी मंत्रिपदासंबंधातील आपली भूमिका १८ जुलै रोजी जाहीर करू, असे सांगितले. मात्र, एकंदतरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. त्यामुळे, आमची भूमिका ठाम आहे. यापुढे आम्ही दिव्यांगांसाठी काम करायचं आहे, शहीद कुटुंबांसाठी काम करायचं आहे, घरेलु कामगारांसाठी काम करायचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांसाठी काम करायचं आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. 

तर गुवाहटीला गेलो नसतो

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा अजित पवार गटही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे, 'ज्यांना संपूर्ण भाकरी मिळणार होती, त्यांना आता अर्धी भाकरी मिळेल', अशा प्रकारची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून दिली जात होती. त्यावर, भूमिका स्पष्ट करताना आमदार बच्चू कडू यांनी आपण मंत्रिपदासाठी जास्त आग्रही नसल्याचे म्हटले. 

"२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी मला सहकार्य करायला सांगितले होते. उद्धव यांनी आम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला. त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे, त्यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी दिली. त्यानंतर मी दिव्यांग मंत्रालयासाठी उद्धव यांच्याकडे शब्द टाकला होता. पण ते त्यांनी केले नाही. ते झालं असतं तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री झाल्यावर मला दिव्यांग मंत्रालय दिले. त्यामुळे मी अजिबात नाराज नाही," असे कडू म्हणाले.

१८ जुलैला निर्णय घेणार!

"शिंदे-फडणवीस सरकार आले असताना त्यांनी दिव्यांग मंत्रालयाचा विचार केला. त्यामुळे या सरकारमध्ये तीन पक्षांचे नवे समीकरण सुरू झाले असताना आज मी निर्णय घेणार होतो. काल मी 'इतनी शक्ती हमें दे न दाता' ही प्रार्थना ऐकली आणि माझा मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो, पण मुख्यमंत्री शिंदे यांनी मला सांगितले की दावा सोडू नये. १७ जुलैला मला त्यांनी भेटीची वेळ दिली आहे. त्यानंतर १८ जुलैला मी निर्णय जाहीर करणार आहे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

नाराज नाही, उलट खुश आहे

"मी सध्याच्या राजकीय समीकरणाने नाराज नाही, उलट मी खुश आहे. सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहेत. अशा वेळी मी अजिबात नाराज नाही. सरकार स्थिर आहे याचा मला आनंद आहे. पण आमदार वाढल्याने किती जणांना मंत्रीपदं देणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून मी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी कमी व्हावी या हेतूने मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो. पण शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी मला फोन केले. त्यामुळे मी सध्या कुठलाही निर्णय घेत नसून १७ जुलैला शिंदे यांना भेटणार आहे. त्यानंतर पुढील गोष्टी ठरवेन," असेही कडू यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: "I will work as a slave to Eknath Shinde for his personal life.", Bachhu kadu on CM Shinde of divyang mantralay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.