अभिनंदन वर्धमान सुखरुप परतल्याचा 'मनसे' आनंद - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 08:22 AM2019-03-02T08:22:26+5:302019-03-02T08:31:46+5:30
'भारतीय वायुसेनेचे वैमानिक अभिनंदन हे सुखरूप परत आले ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे. अभिनंदन ह्यांनी ज्या शांतपणे आणि धैर्याने आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.'
मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री भारतात सुखरुप परतले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्ताननेअभिनंदन वर्धमान यांना भारताच्या स्वाधीन केले. हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या आई-वडिलांनी अटारी बॉर्डरवर हजर राहून अभिनंदन वर्धमान यांचे भारतात स्वागत केले. तसेच, संपूर्ण भारतीयांनी त्यांच्या परत येण्याचा जल्लोष साजरा केला.
अभिनंदन वर्धमान सुखरुप परत आले याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'भारतीय वायुसेनेचे वैमानिक अभिनंदन हे सुखरूप परत आले ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे. अभिनंदन ह्यांनी ज्या शांतपणे आणि धैर्याने आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.'
#WelcomeHomeAbhinandan भारतीय वायुसेनेचे वैमानिक अभिनंदन हे सुखरूप परत आले ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे. अभिनंदन ह्यांनी ज्या शांतपणे आणि धैर्याने आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे
— Raj Thackeray (@RajThackeray) March 1, 2019
दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. यावेळी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र,अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले.
IAF pilot Abhinandan Varthaman coming back safely is a moment of immense happiness for the MNS. His conduct whilst being in custody and facing the situation with a brave and calm disposition is what makes every Indian proud of him. Any amount of praise is not enough.
— Raj Thackeray (@RajThackeray) March 1, 2019