मुंबई: हवाई दलाच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला आहे. मंगळवारी रात्री हवाई दलाचं एएन-32 विमान बंगळुरुला जाण्यासाठी उड्डाण करत होतं. त्यावेळी धावपट्टीवरुन ठराविक अंतर कापल्यानंतरही विमानानं उड्डाण केलं नाही. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. मात्र यामुळे 50 विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. हवाई दलाचं एएन-32 विमान धावपट्टी क्रमांक-27 वर ओव्हररन झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली. एएन-32 बंगळुरुच्या येहलांका हवाई तळावर जाण्यासाठी उड्डाण करत असताना ही घटना घडली. विमानतळावरील 27 व्या क्रमांकाची धावपट्टीवरुन नागरी विमानांची उड्डाणं होत नाहीत. त्यामुळेच एएन-32 विमान ओव्हररन झालं, त्यावेळी त्या भागात कोणीही नव्हतं. यामुळे अपघात टळला. मात्र यामुळे 50 विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. यातील काही विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या. तर काहींची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ओव्हररन म्हणजे काय?विमान उड्डाण करताना धावपट्टीवर काही वेळ धावतं. त्यानंतर ठराविक अंतर कापल्यावर ते आकाशाच्या दिशेनं झेपावतं. ज्यावेळी विमान ठराविक अंतर पार केल्यानंतरही आकाशात न झेपावता धावपट्टीवरुनच पुढे जात राहतं, त्याला तांत्रिक भाषेत ओव्हररन म्हटलं जातं. ओव्हररनच्या वाढत्या घटनागेल्या काही दिवसांपासून जगभरात ओव्हररन होण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे अनेक विमानांचे अपघातदेखील झाले. जानेवारीत इथोपियन एअरलाईन्सचं बोईंग 737-800 विमान धावपट्टीवर 125 मीटर ओव्हररन झालं होतं. त्यात 139 प्रवासी होते.