इमानला आज डिस्चार्ज

By admin | Published: May 4, 2017 03:24 AM2017-05-04T03:24:20+5:302017-05-04T03:24:20+5:30

चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या, तसेच जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या

Iamna Discharged Today | इमानला आज डिस्चार्ज

इमानला आज डिस्चार्ज

Next

मुंबई : चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या, तसेच जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी सकाळी १०.३० वाजता डिस्चार्ज देण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी २५ वर्षांनंतर उपचारांकरिता मुंबईला आलेल्या इमानचे वजन आता १७६ किलो एवढे झाले आहे. यापुढील उपचारांसाठी इमान अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे.
इमान गुरुवारी सकाळी एअरबस-३००ने जवळपास साडेतीन तासांचा प्रवास करणार आहे. या प्रवासासाठी इमानच्या गरजेनुसार विशेष सोयी असलेली ही एअरबस असणार आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत इमानला अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी विशेष रुग्णवाहिकेतून इमानला सैफी रुग्णालयातून आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे नेण्यात येईल. इमानसोबत व्हीपीएस हेल्थकेअरच्या चमूमधील डॉक्टर्स, परिचारिका प्रवास करतील, तसेच तिची बहीण शायमासुद्धा सोबत असेल. अबुधाबीच्या प्रवासाच्या वेळी इमानला क्रेनची गरज नसून, इटलीहून केवळ विशेष स्ट्रेचरची तरतूद करण्यात आली आहे. अबुधाबी येथील रुग्णालयातही इमानचे उपचार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)च्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहेत.
अबुधाबी येथील रुग्णालयातील उपचारानंतर इमानला चालणेही शक्य होईल, यासाठी ते पूर्ण प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे खूप सकारात्मक दिशेने जात असल्याची भावना तिची बहीण शायमा हिने व्यक्त केली. सैफी रुग्णालयातील इमानच्या उपचाराच्या चमूतील डॉ. अर्पणा भास्कर यांनी सांगितले की, ‘फेब्रुवारी महिन्यात दाखल झाल्यापासून इमानच्या प्रकृतीत ७५ टक्के प्रगती झाली आहे. आता केवळ मज्जासंस्था आणि फिजिओथेरपीचे उपचार तिच्यावर होतील.’ सैफी रुग्णालयाचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर हुजैफा शेहाबी यांनी सांगितले की, ‘व्हीपीएस हेल्थकेअरच्या प्रशासनाकडून ‘इमानची प्रकृती स्थिर असून, ती प्रवास करू शकते,’ असा आशयाचा अधिकृत ई-मेल सैफी रुग्णालय प्रशासनाला आला आहे. इमानच्या तब्येतीविषयीचे सर्व तपशील तिच्या कुटुंबीयांना आणि व्हीपीएस हेल्थकेअरच्या प्रशासनाला कळविण्यात आला आहे.’ (प्रतिनिधी)

Web Title: Iamna Discharged Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.