नरेंद्र मोदींच्या PMO मध्ये काम केलेले धडाकेबाज IAS अधिकारी आता फडणवीसांचे 'सेक्रेटरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 06:12 PM2022-07-12T18:12:13+5:302022-07-12T18:13:44+5:30

श्रीकर परदेशी हे काही महिन्यांपूर्वीच ते सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर रूजू झाले होते

IAS officer who worked in Narendra Modi's PMO, now Devendra Fadnavis 'secretary' of shrikar pardeshi | नरेंद्र मोदींच्या PMO मध्ये काम केलेले धडाकेबाज IAS अधिकारी आता फडणवीसांचे 'सेक्रेटरी'

नरेंद्र मोदींच्या PMO मध्ये काम केलेले धडाकेबाज IAS अधिकारी आता फडणवीसांचे 'सेक्रेटरी'

googlenewsNext

मुंबई - राज्यात सत्तांतर होताच आता प्रशासकीय बदल्यांच्या कामालाही वेग आला आहे. आपल्या मर्जीतला अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी फिल्डींग लागताना दिसत असून आता पीएमओ कार्यालयात काम केलेले सनदी अधिकारी श्रीकर परदेशी हे राज्यात परतले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, मोदींच्या पीएमओ कार्यलयात काम केलेले श्रीकर आता फडणवीसांचे प्रशासकीय शिलेदार असणार आहेत. 

श्रीकर परदेशी हे काही महिन्यांपूर्वीच ते सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर रूजू झाले होते. पंतप्रधान कार्यालयात तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत कारकीर्द गाजवलेलेडॉ. श्रीकर परदेशी केंद्रातील प्रतिनियुक्तीचा कालावधी आटोपून जून 2021 मध्ये राज्यात परत आले. त्यावेळी, ‘सिकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता, राज्यात सत्ताबदल होताच, त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. तर, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी कामकाज पाहिले आहे. 

कोण आहेत श्रीकर परदेशी

जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवाया करत डॉ. श्रीकर परदेशी या मराठमोळ्या अधिकाऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नव्हे तर खुद्द प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनादेखील परदेशी यांच्या चोख कामगिरीने प्रभावित केले. त्यांची थेट दिल्लीमध्ये प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून नेमणूक केली होती. केंद्रीय प्रशासनात मराठी अधिकाऱ्यांचा दबदबा निर्माण करणारे श्रीकर कवठेमहांकाळचे रहिवासी. वडील केशव वनविभागात अधिकारी असल्याने सतत बदल्या व्हायच्या, त्यामुळे श्रीकर यांचे शिक्षणही फिरत्या स्वरूपाचेच झाले. तीनही मुलांच्या शिक्षणावर आईचे विशेष लक्ष होते. श्रीकर यांनी एमबीबीएस व एमडीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. काहीकाळ वैद्यकीय प्रॅक्टिसही केली, पण प्रशासकीय सेवेचे आकर्षण कायम होते. २००१ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात पहिले तर देशात दहावे आले.

या ठिकाणी उमटवला कामाचा ठसा

कोल्हापुरात अपर जिल्हाधिकारी, यवतमाळला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व नांदेडला जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त, राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक, प्रधानमंत्री कार्यालयात संचालक आणि उपसचिव असा त्यांचा नेत्रदीपक प्रशासकीय प्रवास आहे. अर्थात या वेगवान प्रवासाला त्यांची धडाकेबाज कामगिरी कारणीभूत ठरली आहे. नांदेडमध्ये बोगस पट दाखवून शासनाने अनुदान हडपण्याचा वर्षानुवर्षे सुरू असणारा बिनबोभाट कारभार त्यांनी हाणून पाडला. पटपडताळणी काटेकोरपणे राबविली. शासनाचे कोट्यवधी रुपये वाचविले. पिंपरी-चिंचवडमध्ये धनदांडग्यांची वीस-वीस मजली इमारतींची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पिंपरी-चिंचवडकरांनी त्यांना बुलडोझर मॅन अशी पदवी बहाल केली. कॉपीमुक्त परीक्षा अभियान, यवतमाळ, नांदेड व अकोल्यातील जलसंधारण मोहीम, नागरिकांना सरकारी सेवांची माहिती देण्यासाठी सारथी हेल्पलाइन अशी त्यांची लक्षवेधी कामगिरी ठरली आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला आहे. चोख कामकाजाचा परदेशी पॅटर्न निर्माण करणारा हा अधिकारी आपल्या सांगलीचा आहे ही आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट.
 

 

Read in English

Web Title: IAS officer who worked in Narendra Modi's PMO, now Devendra Fadnavis 'secretary' of shrikar pardeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.