आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर, दहावीत मुंबईचा स्वयम दास बोर्डात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 07:05 PM2018-05-14T19:05:00+5:302018-05-14T19:05:00+5:30

काऊन्सिल फाॅर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (अायसीएसई) च्या परीक्षेत मुंबईचा स्वयम दास हा दहावीत 99.4 टक्के गुण मिळवत देशात पहिला अाला अाहे. तर 12 वीच्या परीक्षेत एकूण 7 विद्यार्थ्यांनी एकसारखे गुण मिळवत पहिले स्थान पटकावले अाहे.

ICSE board results declared , Swayam Dass stood 1st in 10th | आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर, दहावीत मुंबईचा स्वयम दास बोर्डात पहिला

आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर, दहावीत मुंबईचा स्वयम दास बोर्डात पहिला

Next
ठळक मुद्देमुंबईचा स्वयम दास हा दहावीत 99.4 टक्के गुण मिळवत देशात पहिला एकसारखे गुण मिळवत 12 वीच्या परीक्षेत 7 विद्यार्थ्यांनी पटकावले पहिले स्थान

मुंबई : काऊन्सिल फाॅर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (अायसीएसई) च्या परीक्षेत मुंबईचा स्वयम दास हा दहावीत 99.4 टक्के गुण मिळवत देशात पहिला अाला अाहे. तर 12 वीच्या परीक्षेत एकूण 7 विद्यार्थ्यांनी एकसारखे गुण मिळवत पहिले स्थान पटकावले अाहे. 10वीचा निकाल 98.5 टक्के तर 12 वीचा निकाल 96.21 टक्के लागल्याची माहिती बाेर्डाकडून देण्यात अाली अाहे. अायसीएसईचा निकाल साेमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात अाला. यंदा या परीक्षेत मुंबईने बाजी मारली अाहे. 

    यावर्षी आयसीएसईची परीक्षा २६ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. तर १२ वीच्या परीक्षेत मुलींनी ९७.६३ टक्के मिळवले असून मुलांनी ९४.९६ टक्के मिळवले आहेत. १०वी मध्ये ९८.९५ टक्के आणि मुलांनी ९८.१५ टक्के मिळवले आहेत. १२ वीत पहिल्या आलेल्या ७ विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्या लिलावतीबाई पोदार हायस्कूलमधील अभिज्ञान चक्रवर्ती याने बाजी मारली आहे. यंदा १२ वीच्या परीक्षेला यावर्षी ८१ हजार विद्यार्थी बसले होते तर १० वीच्या परीक्षेला १ लाख ८४ हजार विद्यार्थी बसले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल लवकर जाहीर करण्यात अाला अाहे. याआधी १२ वीसाठी ४० टक्क्यांना पासिंग होते ते आता ३५ टक्के करण्यात आले आहे. तर १० वी साठी ३५ टक्क्यांचे पासिंग ३३ टक्के करण्यात आले आहे.

    निकाल पाहण्यासाठी www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी भेट द्यावी. तसेच माेबाईल मार्फत निकाल मिळवण्यासाठी ISC Results 2018 किंवा ICSE Results 2018 असे टाईप करुन त्यानंतर युनिक आयडी टाईप करुन तो मेसेज 09248082883 क्रमांकावर पाठवावा.

Web Title: ICSE board results declared , Swayam Dass stood 1st in 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.