मुंबई : कच-याचे विघटन करून केरोसिन (घासलेट)सोबत वापरता येईल असे इंधन (सीटीएल - कॅटेलिक थर्मो लिक्वीफॅक्शन आॅइल) तयार करण्याचे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा दावा माटुंगा येथील इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या (आयसीटी) बायोटेक्नॉलॉजी विभागाने (डीबीटी) केले आहे. संशोधन यशस्वी झाल्यामुळे चेंबूर येथील माहूलमधील भारत पेट्रोलियम वसाहतीत (बीपीसीएल कॉलनी) यावर आधारित पहिला प्रकल्प राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयसीटीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे देण्यात आली. तसेच पूर्व दिल्ली भागातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.मुंबईत निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट लावणे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने कचरा वर्गीकरणाचा उपाय सांगितला; परंतु वर्गीकरणाच्या उपक्रमापासून अद्याप बहुतांश गृहनिर्माण संस्था, आस्थापना दूर आहेत. तसेच काही ठिकाणी उत्तम प्रकारे वर्गीकरण केले जात असले तरी डम्पिंग ग्राउंडवर कचरा पुन्हा एकत्र केला जातो. त्यामुळे पालिकेचा कचरा वर्गीकरणाचा उपक्रम फारसा प्रभावी ठरला नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, वर्गीकरण न करता, सर्व प्रकारच्या कचºयाचे विघटन करून त्यापासून इंधननिर्मिती करता येऊ शकते, असे संशोधन आयसीटीने केले आहे.पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत दररोज सात हजार मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होते. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे असलेले डम्पिंग ग्राउंड अपुरे पडते. यावर उपाय म्हणून पालिकेने मागील वर्षी मुंबईतील ज्या गृहनिर्माण संस्था, आस्थापना, खासगी आस्थापना २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त चटई क्षेत्रात जागेत वसलेल्या आहेत अथवा ज्या गृहनिर्माण संस्था १०० किलोपेक्षा जास्त कचºयाची निर्मिती करतात, अशा गृहनिर्माण संस्थांनी व आस्थापनांनी कचºयाची विल्हेवाट स्वत: लावावी, असे आदेश दिले होते. आयसीटीचा अशा प्रश्नांवर एक चांगला उपाय असल्याचा दावा आयसीटीतर्फे करण्यात आला आहे.१ टन कचºयाचे विघटनपहिला प्रकल्प येत्या आठवड्यात चेंबूरच्या माहूल भागात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात एक टन कचºयाचे विघटन करून सीटीएल आॅइलची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर १४ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.२ लाख लीटरपाण्याचे विघटनया प्रकल्पामुळे दररोज तब्बल दोन लाख लीटर पाण्याचेही विघटन होणार आहे. प्रयोगाच्या शेवटी मिळणारे पाणी हे घरगुती कामासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीदेखील हा प्रकल्प उपयुक्त आहे.काय आहे प्रकल्प? : म्युनिसिपल सॉलिड व्हेस्ट - म्युनिसिपल लिक्विड व्हेस्ट प्लॅन ट्रिटमेंट प्लॅन (एमएसडब्ल्यू - एमएलडब्ल्यू) असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पात सर्व प्रकारचा कचरा आणि सांडपाणी एकत्र करून त्याचे मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण मोठ्या यंत्रामध्ये बारीक केले जाते. त्यानंतर तयार झालेल्या मिश्रणात कॅटेलिस्ट लिक्विड मिसळले जाते. कचºयाच्या प्रमाणाच्या १ टक्के कॅटेलिस्ट लिक्विड मिसळण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर ९० मिनिटे ते दोन तास हे मिश्रण १५० अंश सेल्सिअस इतक्या तापमानात तापवणे गरजेचे असते. विघटनानंतर शेवटी पाणी, इंधन आणि अल्प प्रमाणात कचरा असे तीन वेगवेगळे घटक मिळतात. एक टन कचºयापासून जवळजवळ ५०० किलो इंधन मिळते. विशेष म्हणजे एक टक्के कॅटेलिस्ट लिक्विड मिसळले जाते, ते लिक्विड रिसायक्लेबल असल्यामुळे प्रकल्पानंतर शेवटी परत मिळवता येते.दुसरा प्रकल्प दिल्लीतदुसरा प्रकल्प पूर्व दिल्ली भागात उभारण्यात येणार असून हा प्रकल्प मुंबईपेक्षा खूप मोठा असेल. या प्रकल्पात तब्बल १०० टन कचºयाचे विघटन करून इंधननिर्मिती करण्यात येणार आहे.३ वर्षांची तपश्चर्या२०१५पासून आयसीटीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख अरविंद लाली, प्रा. हितेश पवार व अन्य चार तज्ज्ञ प्रकल्पावर संशोधन करत होते. यशासाठी त्यांना जानेवारी २०१८ची वाट पाहावी लागली.
मुंबईतील कच-यापासून आयसीटी करणार तेलनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:08 AM