बोरिवली-विरारदरम्यान मोजकेच थांबे देण्याचा विचार

By admin | Published: July 24, 2015 02:05 AM2015-07-24T02:05:51+5:302015-07-24T02:05:51+5:30

विरार जलद लोकल गाड्यांना बोरीवलीनंतरच्या सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येतो. मात्र यात बदल न करता काही नवीन जलद लोकल फेऱ्यांना

The idea of ​​providing only a few stops between Borivali and Virar | बोरिवली-विरारदरम्यान मोजकेच थांबे देण्याचा विचार

बोरिवली-विरारदरम्यान मोजकेच थांबे देण्याचा विचार

Next

मुंबई : विरार जलद लोकल गाड्यांना बोरीवलीनंतरच्या सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येतो. मात्र यात बदल न करता काही नवीन जलद लोकल फेऱ्यांना विरार पुढील मोजक्याच स्थानकांवर थांबा देता येईल का, याची चाचपणी पश्चिम रेल्वेकडून केली जात आहे.
बोरीवलीपुढील उपनगरामध्ये मिळणारी स्वस्त घरे आणि त्यामुळे या भागांत वाढलेली लोकसंख्या पाहता पश्चिम रेल्वेकडून बोरीवली ते विरारपर्यंत जास्त लोकल फेऱ्या चालवल्या जातात. तसेच चर्चगेट, दादर, अंधेरीहूनही विरारसाठी लोकल सोडल्या जातात. तरीही विरारपर्र्यत प्रवास करताना बोरीवली ते विरार दरम्यानच्या स्थानकांवरील प्रवाशांना गर्दीच्या वेळी कसरत करावी लागते. हे पाहता विरार लोकलला बोरिवलीनंतर मोजक्याच स्थानकांवर थांबा देण्याचा विचार करण्यात येत आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १,३00 फेऱ्या चालवल्या जातात. यात ७00पेक्षा अधिक फेऱ्या बोरीवलीपुढील स्थानकांसाठी आहेत. तरीही बोरीवली ते विरार पट्ट्यातील प्रवाशांना कमी पडत असून त्यावर हा नवा उपाय शोधण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: The idea of ​​providing only a few stops between Borivali and Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.