‘मिठी’च्या सौंदर्यीकरणासाठी ‘द्रव्यवती’चा आदर्श घ्यावा, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:29 AM2019-06-30T02:29:17+5:302019-06-30T02:35:51+5:30

राजस्थान सरकार आणि जयपूर विकास प्राधिकरणाने नदीच्या सौंदर्यीकरणावर काम सुरू केले.

 Ideal for the beauty of 'Hughes', 'Ideology', and experts say | ‘मिठी’च्या सौंदर्यीकरणासाठी ‘द्रव्यवती’चा आदर्श घ्यावा, तज्ज्ञांचे मत

‘मिठी’च्या सौंदर्यीकरणासाठी ‘द्रव्यवती’चा आदर्श घ्यावा, तज्ज्ञांचे मत

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : राजस्थानच्या जयपूरमधून वाहणाऱ्या द्रव्यवती नदीला आता जीवनदान मिळाले असून, ती जयपूरची नवी जीवनरेखा म्हणून ओळखली जात आहे. दोन वर्षांपूर्वी नाला म्हणून ओळख असलेल्या द्रव्यवती नदीच्या सौदर्यीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर, टाटा प्रोजेक्टने नदीचे रूपडे पालटले. महत्त्वाचे म्हणजे, बर्ड पार्क, गार्डन, सायकल ट्रॅक, वृक्षारोपण, फूड कोर्ट उभारत नदीतल्या घाण पाण्यावर पुनर्प्रक्रिया करत, तेच पाणी पुन्हा नदीत सोडण्यात राजस्थानला यश आले. परिणामी, असाच आदर्श कित्ता मुंबई पालिकेने गिरवत मिठी नदीच्या सौंदर्यीकरणावर भर द्यावा, अशा सूर तज्ज्ञांमध्ये आहे.

उत्तर पूर्व भागातील आमीर नाहरगडच्या डोंगरातून ही नदी वाहत येते. ४७ किमी लांबीच्या या नदीतून ३०० नाल्यांमधील घाण पाण्यासह सांडपाणी, उद्योगांतील कचरा आणि रसायनमिश्रित पाणी सोडले जात होते. याच पाण्यावर नदीलगतचे शेतकरी भाजीचे उत्त्पादन घेत होते. त्यातच येथील माती आणि पाण्याचे प्रदूषण, तसेच पुराचा धोका वाढत होता. अखेर राजस्थान सरकार आणि जयपूर विकास प्राधिकरणाने नदीच्या सौंदर्यीकरणावर काम सुरू केले. यातच राजस्थान उच्च न्यायालयानेही या प्रकरणात जयपूर विकास प्राधिकरणाला लक्ष घालण्याचे आदेश दिले. दोन वर्षे यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यानंतर, १ हजार ६७७ कोटी किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. निविदा काढल्या. एनसीआरच्या नियोजन विभागाकडून १ हजार ९८ कोटींचे कर्ज घेण्यात आले.

टाटा प्रोजेक्टला खुल्या निविदेद्वार द्रव्यवती नदीचे काम मिळाले. एप्रिल, २०१६ साली काम सुरू झाले. प्रारंभीच्या कामात अनेक अडथळे होते. सुरुवातीला ४० किलोमीटर नदीमधील घाण काढण्यात आली. नदीचा काही भाग सैन्य दलाच्या जागेच्या लगतच्या जमिनीतून वाहत होता. परिणामी, येथे काम करताना सर्व परवानग्या घेणे आवश्यक होते. त्या घेऊन काम वेगाने करण्यात आले. सध्या ५ सिवरेज ट्रीटमेंट प्लांटद्वारे नदीच्या पाण्यावर पुनर्पक्रिया केली जात आहे. १७ कोटी लीटर प्रतिदिन अशी या प्लांटची क्षमता आहे.
पाण्याचा भूगर्भातील स्तर वाढविण्यासाठी नदीवर १०० चेक डॅम आहेत. तीन मोठ्या उद्यानांसह वॉकिंग आणि सायकलिंग ट्रॅक आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने येथे सीसीटीव्ही बसविले आहेत. सतरा हजार नवी झाडे लावली आहेत. त्यामुळे आता पाच लाख चौरस मीटर क्षेत्र हरित झाले आहे.

अशी होते पाण्यावर पुन:प्रक्रिया
- सध्या ५ सिवरेज ट्रीटमेंट प्लांटद्वारे नदीच्या पाण्यावर पुनर्पक्रिया केली जात आहे.
- १७० मिलियन लीटर पाण्यावर प्रतिदिन प्रक्रिया केली जाते. पुनर्प्रक्रियेनंतर ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाते, तर पाण्यातून निघालेला कचरा पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
२१ हजार वृक्षांची लागवड. ५ हजार चौरस मीटरवर हिरवळ. ८२ किमी सायकल ट्रॅक. ४० हजार लोकांना रोजगार. नदीच्या दोन्ही बाजूला वॉक वे. १८० हेक्टरवर व्यवसायिक विकास. स्मार्ट पोल्स (विद्युत दिवे आणि निरीक्षण). उद्याने. १६ किलोमीटर लांबीचा रिव्हर फ्रंड रोड. ४६ हजार चौरस मीटरवर बर्ड पार्क. वॉटरवर्क म्युझियम. योग केंद्र आणि थिएटर. १३ उद्याने, ८० हजार झाडे, १ हजार २०० प्रजाती. फूड कोर्ट.

प्लांटची नावे आणि क्षमता
बस्सी, सीतारामपुरा-२० एमएलडी. देवरी-१५ एमएलडी. संंगनेर-१०० एमएलडी. बंबाला-२५ एमएलडी. गोनेर-१० एमएलडी.
- प्रकल्प खर्च : १ हजार ४७०.८५ कोटी रुपये.
- देखभाल दुरुस्ती खर्च : २०६.०८ कोटी रुपये.
- एकूण खर्च : १ हजार ६७६.९३ कोटी रुपये.

Web Title:  Ideal for the beauty of 'Hughes', 'Ideology', and experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई