Join us  

बच्चू कडूंचं सामाजिक भान, मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापूर्वी केलं रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 2:19 PM

प्रहार संघटनेच्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात रक्तदानाने करण्यात येते.

मुंबई - अचलपूरचे आमदार आणि राज्यमंत्रीबच्चू कडू आज मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. प्रहार संघटनेच्या कुठल्याही आंदोलनाची किंवा चांगल्या कार्याची सुरवात रक्तदानापासून करण्यात येते. त्यामुळे, आज मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी बच्चू कडू यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्याखाली रक्तदान केले. कडू यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले.

प्रहार संघटनेच्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात रक्तदानाने करण्यात येते. त्यामुळे बच्चू कडूंनी पदभार स्विकारण्यापूर्वी रक्तदान केलं. यापूर्वी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतानाही बच्चू यांनी रक्तदान केलं होतं. आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन रक्तदानानंतर आमदार बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यावेळी, प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गुलाबबाबा पॅलेसमध्ये रक्तदान आयोजित करण्यात आले होते. यात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. रक्तदानाकरिता 700 ते 800 कार्यकर्ते तयार होते. यातील 350 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. तर, आजही बच्चू कडूंसोबत अनेकांनी मंत्रालया आवारात रक्तदान करून बच्चू यांच्या कार्याला पाठिंबा दिला.

दरम्यान, निवडणुकांवेळी अमरावती जिल्ह्यातील चिघळलेली परिस्थिती पाहता बघता बच्चू कडू यांनी शक्तिप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  

टॅग्स :बच्चू कडूरक्तपेढीमंत्रीमुंबई