तुमच्यातल्या हीरोला ओळखा - सत्यार्थी
By admin | Published: August 9, 2015 02:59 AM2015-08-09T02:59:26+5:302015-08-09T02:59:26+5:30
तुमच्यातल्या हीरोला ओळखा, बाहेरच्या मुखवट्यांवर विश्वास ठेवू नका, असा संदेश नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला. आयआयटी मुंबईच्या
मुंबई : तुमच्यातल्या हीरोला ओळखा, बाहेरच्या मुखवट्यांवर विश्वास ठेवू नका, असा संदेश नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला. आयआयटी मुंबईच्या दीक्षान्त समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की प्रत्येक सामान्य माणसात बदल घडविण्याची ताकद आहे़ ती ताकद प्रत्येकाने
जागृत केली पाहिजे. केवळ स्वत:पुरता विचार न करता देश आणि
वैश्विक ध्येय बाळगा, तेव्हाच खरे समाधान लाभेल.
आयआयटी मुंबईत दीक्षान्त समारंभात २,३८९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभाला आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. देवांग खक्कर उपस्थित होते. यावेळी आॅस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या वतीने प्रा. येहुदी ब्लेचर यांच्या हस्ते सयुक्तिकरीत्या १६ विद्यार्थ्यांना पीएच़डी़ पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभात तीन विद्यार्थ्यांना सत्यार्थी यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या अश्विन आर. या विद्यार्थ्याला ‘प्रेसिंडेट आॅफ इंडिया मेडल’ या सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाच्या एस. विघ्नेश या विद्यार्थ्याला ‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ प्रदान करण्यात आले. तर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाच्या प्रवेश कोचर या विद्यार्थ्याला डॉ. शंकर दयाल
शर्मा हे सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आयआयटी मुंबईचे इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक दिनेश के.
शर्मा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
याप्रसंगी देशाचा आर्थिक विकास अद्ययावत शिक्षणावर अवलंबून असून, समाजातील तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या प्रवाहात अडकून संकुचित विचार
करू नका, त्यामुळे आत्मविश्वासही खुंटतो. आजची पिढी देशासाठी
काय करावे, याबाबत आजही
संभ्रमात आहे ही चिंतेची बाब आहे.
या उलट वैश्विक ध्येय जोपासून त्याकडे आजच्या पिढीने वाटचाल करायला हवी, तरच देशाचाही
विकास होईल अशा प्रेरणादायी शब्दांत सत्यर्थी यांनी विद्यार्थ्यांना संबोधिले.
आनंद महिंद्रा यांना डॉक्टरेट
महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांना आॅटोमोबाइल क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी सत्यर्थी यांच्या हस्ते आनंद महिंद्रा यांना विज्ञान क्षेत्रातील मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महिंद्रा म्हणाले की, चांगल्या संकल्पनांना खतपाणी घातले पाहिजे. तसेच या संकल्पनांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक नव्या इनोव्हेशनला प्रोत्साहन दिले पाहिजे. ‘मेक इन इंडिया’ला ही
पिढी खऱ्या अर्थाने सत्यात उतरविणार आहे, त्यामुळे त्यांना अचूक मार्गदर्शन केले पाहिजे.
घरी आल्याची जाणीव -सत्यार्थी : आपल्या बालमजुरांसाठीच्या कार्याचा प्रवास उलगडताना सत्यार्थी यांनी या समारंभाला उपस्थित राहिल्याने ‘मला घरी आल्याची जाणीव झाली’ असे कृतज्ञतापूर्वक शब्द काढले. सत्यार्थी यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून संपूर्ण आयुष्य बालमजुरांसाठी वाहून घेतले. या क्षेत्रातील
चढ-उतार विद्यार्थ्यांसमोर मांडताना कधीही कोणत्याही संकटाला न घाबरता जिद्दीने तोंड देण्याचा सल्ला दिला.