मुंबई : सकाळी केलेले इडली, ढोकळा किंवा उपमा रात्री खाताना नाके मुरडणाऱ्यांसाठी आता नवी खबर आहे. एक-दोन दिवस नाही तर तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ हे पदार्थ टिकतील आणि त्याच चविने ते खाताही येतील, अशी सायंटिफिक पद्धत मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख वैशाली बांबोले यांनी शोधून काढली आहे.
नैसर्गिक आपत्तीत बचावकार्यादरम्यान लोकांना अन्न कसे आणि कोणते पुरवावे? हा मूलभूत प्रश्न उद्भवतो. शिवाय जास्त दिवस टिकणाºया अन्नाचीही गरज भासते. हे लक्षात घेऊन प्रा. बांबोले यांनी खाद्यपदार्थ ३ वर्षांहून अधिक काळ टिकतील अशा पॅकेट्सची निर्मिती केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या इनोव्हेशन अॅण्ड इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बांबोले यांनी या संंशोधनाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, नेहमीच्या पद्धतीने तयार हे पदार्थ तयार केल्यानंतर त्यांच्या पॅकेट्सवर रेडिएशन आणि थर्मल ट्रीटमेंट केल्याने ते जवळपास तीन वर्षे टिकतात.
काय होईल फायदा?‘रेडी टू इट’ फूडची चलती असलेल्या सध्याच्या काळात प्रा. बांबोले यांचे नवी संशोधन अन्न वाचवण्यासाठी आणि जास्त काळ ते टिकण्यासाठी होऊ शकतो. अशा अन्नाचा वापर अंतराळात जाताना, बचाव कार्यादरम्यान किंवा परदेशात जाताना होऊ शकतो. ही संकल्पना पूर्णत्त्वास नेताना यावर मायक्रोबायोलॉजिकल, कलर, टेक्श्चर, सेन्सरी अनॅलिसिस करण्यात आले असून, त्याची पौष्टिक गुणवत्ताही वैज्ञानिकांकडून तपासण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.मोबाइल कव्हर आणणारअतिरिक्त रेडिएशन थोपविणारे मोबाइल कव्हरही प्रा. बांबोले तयार करत आहेत. कव्हरमधील मॅग्नेटिक मटेरिअलमुळे केवळ आवश्यक तेवढीच मोबाइल फ्रिक्वेन्सी आकर्षित केली जाईल आणि अतिरिक्त रेडिएशनमुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळता येईल, असा दावा त्यांनी केला आहे. त्याचे पेटंट मिळण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.