Join us

आयडॉलच्या विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे अधिक कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:19 AM

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमध्ये शुक्रवारपर्यंत ६७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमध्ये शुक्रवारपर्यंत ६७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यापैकी सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेचे असून, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ९०५ इतकी आहे.यंदा सर्व वर्गांच्या प्रवेशास विलंब शुल्कासह २५ सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यूजीसीने प्रवेशाची तारीख वाढविली असल्याने, आयडॉलच्या प्रवेशाची तारीख वाढविली असल्याचे आयडॉलच्या प्राध्यापक व संचालिका डॉ. कविता लघाटे यांनी सांगितले.आयडॉलमध्ये निश्चित झालेल्या ६७ हजार प्रवेशांपैकी ६४ हजार विद्यार्थांनी शुल्क भरले आहेत. शुल्क न भरलेले विद्यार्थी हे इतर विद्यापीठांचे व शिष्यवृत्तीधारक असून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. ज्यांची तपासणी झाली ते विद्यार्थी अभ्यासक्रमाचे शुल्क भरून आपले प्रवेश निश्चित करतील, अशी माहिती आयडॉलकडून देण्यात आली आहे.कला शाखेलाही पसंतीआयडॉलचे सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेत झाले असून, त्याखालोखाल कला शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. बी.ए. व एम.ए. या अभ्यासक्रमामध्ये १८,९६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेत १,८०६ विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे. यानुसार आतापर्यंत वाणिज्य शाखेत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याशिवाय बी.कॉम व बी.एस्सी आयटी, एम.ए, एम.ए शिक्षणशास्त्र, एम.कॉम, एम.ए व एम.एस्सी गणित, एम.एस्सी आयटी, एम.सी.ए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांमध्ये हे प्रवेश होत आहेत.मुदतवाढ मिळाल्याने सर्व शाखांतील प्रवेशांत वाढ होणार असल्याची माहिती आयडॉल प्रशासनातर्फे देण्यात आली.>आयडॉलमध्ये झालेले अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबी.ए. -१२,८४३बी.कॉम. - १८,०७०एम.ए. - ५,५२१एम.कॉम. - २४,४२८एम.ए.-शिक्षणशास्त्र- ५९९पीजीडीएफएम व डीओआरएम- ४०७बी.एस्सी. आयटी- ४२३एम.एस्सी. आयटी- ६०७एम.एस्सी. गणित- २४५एम.सीए. - ५३१