मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी झालेल्या निकाल गोंधळातून मार्ग काढत परीक्षा विभाग आगामी परीक्षा घेत आहे. यातच आता मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रथम वर्ष बी.कॉम. आणि बी.ए.च्या परीक्षा एप्रिल - मेमध्ये होणार आहेत. त्यासाठीचे हॉल तिकीट शनिवारपासून आॅनलाइन उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी ते स्वत:च्या लॉगिन आयडीवरून घेण्याच्या सूचना आयडॉल संचालकांकडून करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सूचनापत्र संचालकांकडून संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे.मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) नोकरी करणारे आणि शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहिलेले लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट गोळा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांत जाणे शक्य नसल्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांना दिलेल्या लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून ते डाउनलोड करतायेणार आहे. ते आपलालॉगिन आयडी किंवा पासवर्ड विसरल्यास आयडॉलच्या http://idoloa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावरून ते पूर्ववत करून घेऊ शकतात.आयडॉलच्या http://idoloa.digitaluniversity.ac/आणि http://mu.ac.in/portal/distance-open-learning/ या संकेतस्थळांवरून विद्यार्थी आपले हॉल तिकीट २१ एप्रिलपासून डाउनलोड करून घेऊ शकतात.
आयडॉलच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन हॉल तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:31 AM