आता गुगल अर्जाद्वारे होणार आयडॉलच्या बॅकलॉग परीक्षा, आजपासून आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 05:16 AM2020-10-19T05:16:57+5:302020-10-19T05:17:06+5:30

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) स्थगित केलेल्या अंतिम वर्षाच्या व बॅकलॉग परीक्षांचे आयोजन १९ आॅक्टोबरपासून सुरू केले आहे. सर्व परीक्षा ऑनलाइन होतील. आयडॉलच्या एकूण २१ पैकी १७ परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहेत.

Idols backlog test will now be conducted through Google application starting from today | आता गुगल अर्जाद्वारे होणार आयडॉलच्या बॅकलॉग परीक्षा, आजपासून आयोजन

आता गुगल अर्जाद्वारे होणार आयडॉलच्या बॅकलॉग परीक्षा, आजपासून आयोजन

Next

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याने तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे कारण देत आयडॉलच्या परीक्षा १८ आॅक्टोबपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. आता सोमवार, १९ ऑक्टोबरपासून त्या सुरू होत असून २२ ऑक्टोबपर्यंत सुरू राहतील. या वेळी मात्र सर्व विद्यार्थ्यांची एकत्र परीक्षा घेण्याऐवजी गट करून परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षांचे नियोजन विद्यापीठच करेल. विद्यार्थीसंख्या कमी असल्यामुळे, आयडॉल शिक्षकांच्या साहाय्याने गुगल अर्जाच्या माध्यमातून बॅकलॉगच्या परीक्षा घेण्यात येतील. 

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) स्थगित केलेल्या अंतिम वर्षाच्या व बॅकलॉग परीक्षांचे आयोजन १९ आॅक्टोबरपासून सुरू केले आहे. सर्व परीक्षा ऑनलाइन होतील. आयडॉलच्या एकूण २१ पैकी १७ परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहेत. ४ परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अंतिम वर्ष बीएसस्सी आयटी सत्र ६, तृतीय वर्ष बीएसस्सी कॉम्प्युटर सायन्स, एमएसस्सी भाग २ गणित, आयटी व कॉम्प्युटर सायन्स व एमए शिक्षणशास्त्र भाग २ या परीक्षा व बॅकलॉगच्या प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, बीएसस्सी आयटी सत्र ४ व ५ आणि एमसीए सत्र १ ते ५ या परीक्षा १९ आॅक्टोबरपासून सुरु होत आहेत. या सर्व परीक्षांच्या सराव परीक्षा पूर्ण झालेल्या
 आहेत. 

या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर - 
तृतीय वर्ष बीए व बीकॉम या परीक्षा २६ ऑक्टोबर २०२० पासून आॅनलाइन सुरू होत असून, पदव्युत्तर द्वितीय वर्षाची एमएची परीक्षा २ नोव्हेंबर २०२० पासून तर द्वितीय वर्ष एमकॉमची परीक्षा ६ नोव्हेंबर २०२० पासून आॅनलाइन सुरू होईल. वेळापत्रक जाहीर झाले असून या परीक्षांच्या सराव परीक्षाही लवकरच घेण्यात येतील. 

गुगल अर्ज म्हणजे काय?
गुगलद्वारे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना एक लिंक देण्यात येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना एक डॉक्युमेंट मिळेल. यात त्यांना परीक्षेचा पेपर मिळेल. त्यावरील योग्य पर्यायांवर क्लिक करून पेपर सोडवून विद्यार्थ्यांना तो सबमिट करावा लागेल. 

Web Title: Idols backlog test will now be conducted through Google application starting from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.