लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जून २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम या परीक्षेचा निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचा निकाल ९४.१९ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
या परीक्षेत एकूण ४ हजार १८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीत २२६०, द्वितीय श्रेणीत १४५४ व ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत ५ हजार ७९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेला एकही विद्यार्थी अनुपस्थित नव्हता. तर या परीक्षेत २५८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
विद्यापीठाने आजपर्यंत उन्हाळी सत्राचे १०७ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने बीई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग) सत्र ७ व ८, बीई (सिव्हिल इंजिनीअरिंग) सत्र ८, तृतीय वर्ष बीए (आयडॉल) व तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल) असे ५ निकाल जाहीर केले.
नोंदणीकृत विद्यार्थी - ५७९१
प्रथम श्रेणी विद्यार्थी - २२६०
द्वितीय श्रेणी विद्यार्थी - १४५४
उत्तीर्ण विद्यार्थी - ४६८
अनुत्तीर्ण विद्यार्थी - २५८
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - ४१८२
उत्तीर्णतेची टक्केवारी - ९४. १९ टक्के