'भाजपने तिकीट दिले नाही तर...: पंकजा मुंडेंनी स्पष्टच भूमिका मांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:44 AM2023-09-28T11:44:15+5:302023-09-28T11:45:11+5:30

काही दिवसापासून माजी आमदार पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

If BJP doesn't give ticket bjp leader Pankaja Munde made a clear stand | 'भाजपने तिकीट दिले नाही तर...: पंकजा मुंडेंनी स्पष्टच भूमिका मांडली

'भाजपने तिकीट दिले नाही तर...: पंकजा मुंडेंनी स्पष्टच भूमिका मांडली

googlenewsNext

मुंबई- गेल्या काही दिवसापासून माजी आमदार पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी राज्यभरात दौराही केला,यामुळे पंकजा मुंडे आता राजकारणात वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काल त्यांनी एका मुलाखतीत विधानसभेच्या तिकीटावरुन भाजपला आव्हान दिलं आहे. आता विधानामुळे आता उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

"मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर 25 कोटींची ऑफर, पण..." केसरकरांचे मोठे विधान

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना यावेळी २०२४ च्या निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिकीटा संदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही. “माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवत नाही माझ्यासारख्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट न देणे हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही, त्यांनी असा निर्णय घेतल्यास त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, आपण नवीन मतदारसंघ शोधत नाही. खासदार पॅीतम मुंडे यांचीही जागाही मी घेणार नसल्याचे स्पष्ट मुंडे यांनी सांगितले. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा मंत्री धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. आता राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि भाजप एकत्र सत्तेत आहेत, हे दोन्ही गट एकत्र निवडणुका लढवणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

भापज नेत्या पंकजा मुंडे यांचा कारखानाही अडचणीत आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रीया दिली. मुंडे म्हणाल्या, सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस मिळाली आहे. ही नोटीस दोन-तीन महिन्यांपूर्वीही आली होती.

Web Title: If BJP doesn't give ticket bjp leader Pankaja Munde made a clear stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.