Join us

EVM चा गैरवापर करून जिंकल्यास असंतोष पसरणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 3:28 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली, भाजपने काल पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली यावरही टीका केली.

Uddhav Thackeray ( Marathi News ) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली, भाजपने काल पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली यावरही टीका केली. 'ईव्हीएम घोटाळा करून ते जिंकलेच तर देशात मोठा असंतोष उसळेल, असा इशाराही उद्वव ठाकरेंनी दिला. तसेच जुमलाचे नामकरण आता गॅरंटी, अशी टीकाही केली.

"उद्योगपती, शेतकरी, कामगारांच्यात असंतोष आहे. पण, ईव्हीएमने हे जिंकू शकतात. जर दुर्दैवाने हे ईव्हीएमने हे जिंकले तर देशात मोठा असंतोष पसरेल, मला याची चिंता वाटते. आपण जनतेसोबत आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सुरुवातीच्या काळापासून मी नितीन गडकरी यांचे नाव ऐकले आहे. भाजपचे ते निष्ठावन कार्यकर्ते आहेत. त्यांनी रस्त्यांचे मोठे काम केले, अशा व्यक्तींचं पहिल्या यादीत नाव नाही. पण घोटाळा करणाऱ्या कृपाशंकर सिन्हा यांचं नाव आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हुकमी एक्का अन् कोल्हापूरची लोकसभा; सतेज पाटलांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे म्हणाले, आता गेल्या दहा वर्षात अनेक जुन्या योजनांची नावे बदलली आहेत तसेच आता जुमलाचे नाव गॅरेंटी झाले आहे, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. आपण सर्व जनतेला भेटत आहोत. सर्व स्तरातील जनता नाराज आहे. यात आपण अंधभक्तांना धरत नाही.त्यांना डोळे असून दृष्टी नाही, असेच म्हणावे लागेल. 

"जनता ही लोकशाहीतील महत्वाची घटक आहे, क्रांती ही नेते करत नसून क्रांती जनता करते. जनतेच्या मनाविरुद्ध झाले तर जनता क्रांती करणारच, भाजपने चंदीगडमध्येही अशा प्रकारे जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्यसभा निवडणुकीनंतर असाच प्रयत्न केला. मात्र आता तोडा, फोडा, तुरुंगात टाका आणि राज्य करा हे जास्त काळ टिकणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा