मुंबई- मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे ३० लाख आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे केंद्र वाढविल्यास महिन्याभरात सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस मिळेल, असा पालिकेचा अंदाज आहे. (If the center is expanded all senior citizens will be vaccinated within a month)
यासाठी १ जानेवारी, २०२२ रोजीचे वय लक्षात घेऊन ५९ वर्षे तीन महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तिचे वय ४४ वर्षे तीन महिने असले, तरीदेखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अडचण जाणवल्यास येथे करा संपर्क - लसीकरण करण्यापूर्वी कोविन अॅपवर नोंदणी होणे गरजेचे आहे. यासाठी रुग्णालयांमध्ये जाऊन थेट नोंदणीचा पर्यायदेखील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. रुग्णालय स्तरावर संबंधित संकेतस्थळाद्वारे नोंदणी करण्यात अडचणी असल्याची बाब काही खासगी रुग्णालयांद्वारे या बैठकीत मांडण्यात आली. यासाठी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान खात्यातील अधिकारी यांचा समावेश असलेले पथक तात्काळ गठीत करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. याशिवाय रुग्णालय स्तरावर थेट नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास १९१६’ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.