प्रवासी कमी तर, एसटीची फेरी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:41 PM2020-04-25T18:41:56+5:302020-04-25T18:42:31+5:30

कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने एसटीचे बचतीचे धोरण

If commuters are low, ST ferries are closed | प्रवासी कमी तर, एसटीची फेरी बंद 

प्रवासी कमी तर, एसटीची फेरी बंद 

Next

 

मुंबई : आधीच तोट्याचा गर्तेत अडकलेल्या एसटीचे चाक कोरोनामुळे आणखीन खोलात गेले आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यात एसटी महामंडळाची सेवा बंद आहे.  परिणामी, एसटीला मागील एक महिन्यापासून दररोज 22 कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे एसटीने बचतीचे धोरण सुरू केले असून 40 टक्के पेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय नुकताच पार पडलेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

लॉकडाऊन एसटीच्या राज्यभरातील फेऱ्या बंद केल्या आहेत. फक्त मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी सुरु आहे. दोन टप्प्यातील लॉकडाऊनमुळे एसटीला सुमारे  ८८० कोटींचे उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी बचतीचे धोरण राबविण्यात येणार आहे.  राज्यातील ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांमध्ये 40 टक्के पेक्षा कमी प्रवासी असल्यास या फेऱ्या बंद होणार आहे. मात्र यानिर्णयात बंधनकारक/शालेय फेऱ्या वगळण्यात आल्या आहेत. 
 

--------------------

रात्रीच्या वेळेत लांब आणि मध्यम लांब पल्यांमध्ये फारच थोड्या प्रमाणात प्रवाशांची चढ उतार होते. त्यामुळे वाहकांना जास्त कामगिरी नसते. त्यामुळे रातराणीच्या फेऱ्यांमध्ये चालक तथा वाहकांची नियुक्ती करून एका वाहकांची बचत करण्याचे आदेश एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिले आहे.

 ----------------------

२० पेक्षा कमी प्रवासी असल्यास फेरी बंद : प्रवाशांच्या संख्येवरून ४० टक्के प्रवाशांची टक्केवारी काढली जाणार आहे. बसमध्ये २० पेक्षा कमी प्रवासी असल्यास फेऱ्या बंद करण्यात येणार आहे. 

-------------------

Web Title: If commuters are low, ST ferries are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.