प्रयोग यशस्वी झाला, तरच प.रे.वर एसी लोकल

By admin | Published: March 30, 2016 02:39 AM2016-03-30T02:39:43+5:302016-03-30T02:39:43+5:30

पश्चिम रेल्वेसाठी असणारी पहिली एसी (वातानुकूलित) लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पहिल्या एसी लोकलच्या सेवेपासून मुकावे लागणार आहे.

If the experiment was successful then only AC Local on P.R. | प्रयोग यशस्वी झाला, तरच प.रे.वर एसी लोकल

प्रयोग यशस्वी झाला, तरच प.रे.वर एसी लोकल

Next

मुंबई : पश्चिम रेल्वेसाठी असणारी पहिली एसी (वातानुकूलित) लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पहिल्या एसी लोकलच्या सेवेपासून मुकावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या अजब निर्णयावर पश्चिम रेल्वेच्या कोणताही अधिकारी भाष्य करण्यास तयार नाही. याबाबत पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांनी मात्र मध्य रेल्वेवर पहिल्या एसी लोकलचा प्रयोग यशस्वी झालाच तरच पुढील येणाऱ्या एसी लोकल पश्चिम रेल्वेवर चालविल्या जातील, असे लोकमतशी बोलताना सांगितले.
पहिल्या एसी लोकलचे मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवर चाचणी करतानाच ती याच मार्गावर चालविण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. याविषयी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल यांना विचारले असता, त्यावर थेट बोलणे टाळले. या लोकलची चाचणी मध्य रेल्वेवर करुन ती सेवेत दाखल होईल. जर त्याची चाचणी मध्य रेल्वेवर यशस्वी झाली तरच पश्चिम रेल्वेवर एसी लोकल दाखल होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र चाचणी यशस्वी होईलच, अशी आशाही अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रवाशांचे सर्वेक्षण
ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकलची चाचणी करतानाच याच मार्गावर ती चालविण्याचे नियोजन केले जात आहे. हे पाहता ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या किती, फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासचे प्रवासी किती यातही महिला आणि पुरुष प्रवाशांची संख्या यासह काही माहिती गोळा करण्याचे काम क्रिस या रेल्वेच्या संस्थेला दिले आहे.

Web Title: If the experiment was successful then only AC Local on P.R.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.