गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना आपडा म्हटले तर तुमचा तीळ पापडा का झाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:46+5:302021-01-08T04:15:46+5:30

हेमराज शाह यांचा सवाल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यामधील शाब्दिक युद्ध सुरूच असून, गुजराती माणसाने ...

If a Gujarati man called Uddhav Thackeray an apada, why did your mole become a papada? | गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना आपडा म्हटले तर तुमचा तीळ पापडा का झाला ?

गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना आपडा म्हटले तर तुमचा तीळ पापडा का झाला ?

Next

हेमराज शाह यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यामधील शाब्दिक युद्ध सुरूच असून, गुजराती माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना आपडा म्हटल्यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा का झाला? असा सवाल शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी विचाराला आहे.

गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले. मुंबईतील सर्व धर्मीयांना आपलेपण दिले ते उद्धव ठाकरे यांनी. भाजपने फक्त निवडणुकीपुरते गुजराती बांधवांना वापरले, असे म्हणत शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी अतुल भातखळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे ? भाजपला वोट देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे ? असाही प्रश्नही त्यांनी केला.

हेमराज शाह म्हणाले, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपमध्ये हैराण आहेत. त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे. मुंबईमा उद्धव ठाकरे आपडा वाटणार, कारण ते सुसंस्कृत आहेत. गुजराती माणसाला ते आवडतात. तुमचा जळफळाट होण्याचे कारण ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्ही नंतर खोटी आश्वासन देऊन फसवत आहात.

Web Title: If a Gujarati man called Uddhav Thackeray an apada, why did your mole become a papada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.