हॉर्नचा आवाज वाढल्यास पुन्हा सिग्नल पडणार; मुंबई पोलिसांचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:44 AM2020-02-01T05:44:38+5:302020-02-01T05:45:14+5:30

हॉर्नच्या आवाजाने ८५ डेसिबल्सची मर्यादा ओलांडल्यास सिग्नल रिसेट होईल.

If the horn noise increases, the signal will fall again; A unique initiative of Mumbai Police | हॉर्नचा आवाज वाढल्यास पुन्हा सिग्नल पडणार; मुंबई पोलिसांचा अनोखा उपक्रम

हॉर्नचा आवाज वाढल्यास पुन्हा सिग्नल पडणार; मुंबई पोलिसांचा अनोखा उपक्रम

Next

मुंबई : दिल्ली, बंगळुरू असो किंवा मुंबई, सर्वच ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या आहे. सिग्नल लागल्यानंतर काही सेकंदही थांबण्याचा वाहन चालकांना संयम नसतो. ते जोरजोरात हॉर्न वाजविणे सुरू करतात. यावर तोडगा म्हणून मुंबई पोलिसांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

हॉर्नच्या आवाजाने ८५ डेसिबल्सची मर्यादा ओलांडल्यास सिग्नल रिसेट होईल. त्यामुळे वाहनचालकांना सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी टिष्ट्वट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरातील दुभाजकावरील यंत्रणेत हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजणारा डेसिबल मीटर बसविण्यात येणार आहे.

या मीटरद्वारे वाहन चालकांकडून वाजविण्यात येणाऱ्या हॉर्नची तीव्रता तपासण्यात येणार आहे. ती ८५ डेसिबलपेक्षा जास्त झाल्यास सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे वाहन चालकांना जास्त वेळ सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार आहे. सिग्नलवर मोठमोठ्याने हॉर्न वाजविण्यापेक्षा संयम ठेवून सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहणे, हे वाहन चालकांना शिकविण्यासाठी पोलिसांनी हा प्रयोग केला आहे.

‘नो हॉर्न’बाबत जनजागृतीसाठी खूप चांगला व्हिडीओ आहे. हॉर्न वाजविणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत, पण सिग्नलवर लावण्यात आलेले डेसिबल मीटर कायमस्वरूपी लावण्यात यावेत. सीटबेल्ट, हेल्मेटप्रमाणे ‘नो हॉर्न’बाबत जनजागृती अभियान राबविले जावे.
- सुमेरा अब्दुल अली, सर्वेसर्वा, आवाज फाउंडेशन

Web Title: If the horn noise increases, the signal will fall again; A unique initiative of Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.