मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. खरी राष्ट्रवादी कोणाची यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आजही याबाबत सुनावणी झाली. दरम्यान, आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर टीका करत काही गौप्यस्फोट केले आहेत.
मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती
"मलाही मंत्रिपदाच्या ऑफर होत्या, मलाही मॅनेज होण्याबाबत अनेकदा विचारले होते. पण, मी त्यावेळी मॅनेज झालो नाही. तेव्ही मी मॅनेज झालो असतो तर आज मी या मंत्रिमंडळात मंत्री असतो, असा मोठा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला.
"मी तेव्हा समझोता केला असता, तर तेव्हा तुरुंगात गेलो नसतो तर आज मंत्रिपद मिळाले असते. आम्हाला जसा त्रास झाला तसा त्रास यांना होऊ नये म्हणून आमची ही सर्व लोक तिकडे गेले आहेत, असा टोलाही देशमुख यांनी लगावला.
अनिल देशमुख म्हणाले, अजितदादांना आतापासूनच साईडलाइन का करत आहेत हेच कळत नाही. लोकसभेनंतर साईडलाइन करणार आहेत हे माहित आहे हे आता आम्हालाही कळत नाही, असंही देशमुख म्हणाले.