... नाही तर बांधकाम पूर्णचा परवाना विसरा !; रेन हार्वेस्टिंगसाठी ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 01:36 PM2023-03-23T13:36:17+5:302023-03-23T13:36:37+5:30

पाण्याची वाढती गरज लक्षात घेता मुंबई महापालिकेनेही नवीन बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे.

... If not, forget the construction completion permit !; Construction of 815 new wells for rain harvesting | ... नाही तर बांधकाम पूर्णचा परवाना विसरा !; रेन हार्वेस्टिंगसाठी ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम

... नाही तर बांधकाम पूर्णचा परवाना विसरा !; रेन हार्वेस्टिंगसाठी ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम

googlenewsNext

मुंबई : मुंबईत २०१० मध्ये पाऊस कमी पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे पावसाचे पाणी अडवून अधिकाधिक बचत आणि संचयाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिकेने नवीन बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असून हार्वेस्टिंग प्रकल्पांसाठी वर्षभरात मुंबईत तब्बल ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे.

पावसाचे वाहून जाणारे पाणी जागीच जिरविण्यासाठी सर्व प्रशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, कार्यालये, रहिवासी सोसायट्यांना ‘रेन वॉट हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेता मुंबई महापालिकेनेही नवीन बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे.

पर्यायी जलस्रोत
पिण्याच्या पाण्याचा वापर कमी व्हावा यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पात विंधन आणि कंगन विहिरी खोदण्यास पालिका परवानगी देते. त्याचा उपयोग पर्यायी जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी झाला आहे. 

पालिकेकडून दिली जाते मुभा
शहर आणि उपनगरातील विहिरींच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईत खोदकाम करून विहिरीचे बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र पाच फुटांपर्यंत खोदकाम करून कूपनलिका आणि रिंग वेल बांधण्यास परवानगी दिली जाते. तसेच अस्तित्वातील विहिरींची डागडुजी व सफाई करून पाण्याचा वापर करण्यास मुभा देण्यात येते.

भोगवटा प्रमाणपत्र मिळणार नाही

मुंबईत दररोज ३, ८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे पाणी पुरेसे नाही. त्यावर उपाय म्हणून पालिकेने सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी तसेच समुद्राचे खारे पाणी गोडे करणे हे नवीन पर्याय काढले आहेत. त्याचबरोबर  गेल्या काही वर्षांपासून नवीन बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पालिकेने आवश्यक केले असून प्रकल्प नसल्यास इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र व इतर परवाने दिले जात नाहीत. 

Web Title: ... If not, forget the construction completion permit !; Construction of 815 new wells for rain harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई