बदली करणार नसाल, तर घटस्फोटास अनुमती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:33 AM2018-10-26T05:33:35+5:302018-10-26T05:33:46+5:30

बदली करा किंवा घटस्फोटाची तरी अनुमती द्या, अशी अजब मागणी तलाठ्यांनी केली आहे.

If not transferable, allow divorce! | बदली करणार नसाल, तर घटस्फोटास अनुमती द्या!

बदली करणार नसाल, तर घटस्फोटास अनुमती द्या!

Next

मुंबई : बदली करा किंवा घटस्फोटाची तरी अनुमती द्या, अशी अजब मागणी तलाठ्यांनी केली आहे. चार वर्षांपासून आंतरविभागीय बदलीचा प्रस्ताव रखडला आहे, वर्षानुवर्षे घरापासून लांब राहिल्यामुळे कौटुंबिक अडचणी आणि कलह वाढत आहेत. त्यामुळे एक तर बदली करावी अन्यथा घटस्फोटाचा तरी मार्ग मोकळा करा, अशी मागणीच या तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तलाठी पदावर कार्यरत असणाऱ्या ८९ कर्मचाºयांच्या आंतरविभागीय बदलीचा प्रस्ताव रखडला आहे. यादीतील १६ लोकांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. मात्र, उर्वरित ७३ तलाठ्यांचा अर्ज अद्याप तसाच प्रलंबित ठेवण्यात आला. बदलीसाठी महसूल विभागातील अधिकाºयांच्या कार्यालयात चकरा मारूनही दिलासा मिळालेला नाही. आंतरविभागीय बदलीसाठी जे तलाठी दुय्यम सेवा परीक्षा पास झाले आहेत त्यांचाच विचार करण्यात आला आहे. जे तलाठी दुय्यम सेवा परीक्षा पास झाले नाहीत त्यांच्या बदलीचे आदेश निघाले नाहीत, असे विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी रखडलेल्या प्रस्तावाबाबत सांगितले. मात्र, २०११ ते २०१६ पर्यंत तलाठी पदाच्या आंतरविभागीय बदलीसाठी अशा अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. परीक्षा आणि स्थायित्व प्रमाणपत्राची अट शिथिल करून या कालावधीत आंतरविभागीय बदली करण्यात आल्याचा दावा तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. घरातील वडीलधाºयांचे आजारपण, मुलांचे शिक्षण यावर विपरीत परिणाम होत आहे. कौटुंबिक कुरबुरी वाढून वैवाहिक आयुष्यातही कलह वाढत आहेत. त्यामुळे २०११ ते १६ प्रमाणे बदली तरी करा किंवा घटस्फोटाची वाट मोकळी करून द्या, अशी मागणी या तलाठ्यांनी या पत्रात केली आहे.
>चार वर्षे कुटुंबापासून दूर
चार वर्षांपासून वेगवेगळ्या एनओसींची जुळवाजुळव करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा या बदलीच्या प्रस्तावावर सकारात्मक शेरा मारला होता. अट शिथिल करून बदली करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमची बदली रखडवण्यात आली. या रखडलेल्या बदलीमुळे चार वर्षांपासून कुटुंबापासून लांब राहावे लागत आहे, असे या तलाठ्यांनी म्हटले आहे.

Web Title: If not transferable, allow divorce!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.