Join us  

नोव्हेंबरची नियमावली जाहीर न केल्यास बाजारपेठ २० टक्केच राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 2:31 AM

लग्नसराईची बाजारपेठ ही केवळ २० टक्केच राहील, असा इशारा बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनने दिला आहे.

मुंबई : मुंबईतच दरवर्षी दोन लाख लग्नांचे आयोजन होत असते. मुंबईतील एकूण लग्नसराई बाजारपेठ ही अंदाजे आठ कोटी रुपयांची आहे. पण येत्या नोव्हेंबरची योग्य नियमावली सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केली नाही तर लग्नांची संख्या ही ३० टक्क्यांनी कमी होईल. त्याचबरोबर आकारही आणखी ३० टक्क्यांनी कमी होईल व त्यामुळे लग्नसराईची बाजारपेठ ही केवळ २० टक्केच राहील, असा इशारा बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनने दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले होते, पण टाटा केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे, तसेच ९० टक्के बाजारपेठांनी काम सुरू केले आहे, त्यांचा त्यामुळे लाभ होऊ लागला आहे.५० लोकांनी उपस्थित राहण्याच्या निर्बंधांमुळे लग्नसराई बाजारपेठ ही मागे पडू लागली आहे. ५० लोकांची मर्यादा असल्यामुळे अधिकतर लग्नाच्या स्थानांमध्ये काम त्यांचा आकार आणि खर्च यांमुळे होऊ शकत नाही.प्रत्येक जण अशा कठीण समयी आपला व्यवसाय लाभात आणि सुरू ठेवण्यावर भर देत आहे.बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनचे सेक्रेटरी सतीश कामत यांनी सांगितले की, कामाचे स्वरूप पाहता लग्नाचे प्लानिंग हे ४ ते १० महिने अगोदर केलेले असते. म्हणून कॅटरर्स असोसिएशनतर्फे सरकारला विनंती करण्यात येते की, आतापासून तीन महिन्यांसाठी म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी नियमावली तयार करावी.जर कोणती अनिश्चित घटना घडलीच तर सरकार ही नियमावली मागे घेऊ शकते.बाजारपेठेने याआधीच प्रमुख सीझन म्हणजे उन्हाळा वाया घालवला आहे (एप्रिल-मे). म्हणूनच आम्ही सरकारकडे विनंती करतो की, अशा लोकांसाठी नियमावली निर्माण करावी जे आता नोव्हेंबर-डिसेंबरसाठी लग्नाची तयारी करत आहेत, असे बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनचे सेक्रेटरी सतीश कामत यांनी सांगितले.>लग्नसराई बाजारपेठ मोठी : लग्नसराईची बाजारपेठ ही वाटते त्यापेक्षा खूप अधिक मोठ्या प्रमाणावर आहे. एकट्या मुंबईतच दरवर्षी दोन लाख लग्नांचे आयोजन होत असते. जरी आपण प्रत्येक लग्नाचा खर्च चार लाख रुपये धरला, तरी फक्त मुंबईतील एकूण लग्नसराई बाजारपेठ ही अंदाजे आठ कोटी रुपयांची होते, असे बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश चंद्रना यांनी सांगितले.

टॅग्स :लग्न