Join us

प्रवासी कमी तर, एसटीची फेरी बंद, उत्पन्न घटल्याने एसटीचे बचतीचे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:50 AM

एसटीने बचतीचे धोरण सुरू केले असून ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई : आधीच तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या एसटीचे चाक कोरोनामुळे आणखी खोलात गेले आहे. लॉकडाउनमुळे मागील एक महिन्यापासून दररोज २२ कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे एसटीने बचतीचे धोरण सुरू केले असून ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.लॉकडाउनमुळे केवळ मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांसाठी एसटीची सेवा सुरू आहे. दोन टप्प्यातील लॉकडाउनमुळे एसटीला सुमारे ८८० कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी बचतीचे धोरण राबविण्यात येणार आहे.राज्यातील ग्रामीण भागात धावणाºया एसटीच्या फेºयांमध्ये ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी असल्यास या फेºया बंद होणार आहेत. मात्र या निर्णयात बंधनकारक/शालेय फेºया वगळण्यात आल्या आहेत.>२०पेक्षा कमी प्रवासी असल्यास फेरी बंदप्रवाशांच्या संख्येवरून ४० टक्के प्रवाशांची टक्केवारी काढली जाणार आहे. बसमध्ये २०पेक्षा कमी प्रवासी असल्यास फेºया बंद करण्यात येणार आहे.