पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 02:00 PM2023-06-01T14:00:48+5:302023-06-01T14:06:20+5:30
मागील काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मुंबई- मागील काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता पुन्हा एकदा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी भाजपवरील ही नाराजी व्यक्त केली. काल दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडाच आहे. भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊसतोडीसाठी जाईन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार अनिल देशमुख म्हणाले, पंकजा मुंडे काय बोलल्या हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तीक मुद्दा आहे, पंकजा मुंडे राष्ट्रवादीत आले तर स्वागत करु. त्यांच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चर्चा करुन निर्णय घेऊ शकतात. पण, तशा पद्धातीचं माझ्या कानावर काही आलेलं नाही, असंही अनिल देशमुख म्हणाले.
'मी भाजपची आहे, पण पक्ष माझा थोडी...'; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
"अमोल कोल्हे राष्ट्रवादीमध्येच आहेत, ते सक्रिय आहेत. ते कोणताही वेगळा निर्णय घेणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्या त्या जिल्ह्यातील नेते चाचपणी करत आहेत. चाचपणी झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच नेते चाचपणी करत आहेत.चाचपणी झाल्यानंतर एकत्र बसून चर्चा करुन निर्णय घेतील, असंही अनिल देशमुख म्हणाले.
'मी भाजपची आहे, पण पक्ष माझा थोडी...'
माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडाच आहे. भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊसतोडीसाठी जाईन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने त्या भाजपने नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
'भाजप खूप मोठा पक्ष आहे, मी फक्त त्यामध्ये काम करते. गोपीनाथ मुंडे यांनी मोठं काम केलं. मुंडे साहेबांनी अनेक आमदार, खासदार बनवले. यामुळे आता सरकार स्थापन करण्यापर्यंत प्रवास केला. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी कधीही कुणासमोर झुकणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.