खड्डे दाखवल्यास तत्काळ बुजवणार - पालिका आयुक्त अजोय मेहता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 02:32 AM2018-08-04T02:32:45+5:302018-08-04T02:33:13+5:30

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहे.

 If the potholes are shown, then it will rebuild immediately - Municipal Commissioner Ajoy Mehta | खड्डे दाखवल्यास तत्काळ बुजवणार - पालिका आयुक्त अजोय मेहता

खड्डे दाखवल्यास तत्काळ बुजवणार - पालिका आयुक्त अजोय मेहता

Next

मुंबई : गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. मुंबईतील खड्ड्यांबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली असता मंडळांनी खड्डे दाखविल्यास संबंधित विभागातील अधिकारी ते तत्काळ बुजवतील, असे आश्वासन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंडळांना दिले आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, पालिका आणि पोलीस अधिकारी यांची बैठक महापालिका मुख्यालयात नुकतीच पार पडली. या वेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी खड्ड्यांबाबत चिंता व्यक्त केली. त्या वेळी संबंधित गणेश मंडळांनी संबंधित विभागाचे उप आयुक्त आणि सहायक आयुक्तांकडे आपली तक्रार नोंदविल्यानंतर तत्काळ खड्डे बुजविले जातील. मेट्रोच्या अधिकाºयांसोबत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून खड्डे बुजवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
या बैठकीला मेट्रोच्या अधिकाºयांनाही बोलाविण्यात आले होते. मात्र ते आले नाहीत, याबाबत मंडळांनी नाराजी व्यक्त केली.

उरला एक महिना
गणेशोत्सवाला अवघा महिना उरला आहे. बहुतेक मंडळे गणेशमूर्ती दोन आठवडा आधी मंडपात आणतात. परंतु, खड्ड्यांतून गणेशमूर्ती आणायची कशी, ही बाब या वेळी गणेशोत्सव मंडळांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणली.

Web Title:  If the potholes are shown, then it will rebuild immediately - Municipal Commissioner Ajoy Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.