शरजील काहीही बोलला तर एवढा हंगामा कशासाठी?; अबू आझमींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 06:55 PM2020-02-03T18:55:28+5:302020-02-03T19:04:29+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जे काही भाषण करत आहेत, ते पाहिल्यास त्यांना आयुष्यभर जेलमध्ये टाकलं पाहिजे.
मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी)ला विरोध करताना देश तोडण्याची भाषा केल्याने शरजील इमाम याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांचे नेते शरजीलच्या विधानांचं समर्थन करत आहेत. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींनी शरजीलची पाठराखण केली आहे.
मोदीसुद्धा आधी काय काय बोलले आहेत. भाजपाचे लोक कशा पद्धतीची भाषणं करतात हे सगळ्यांनी पाहिलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जे काही भाषण करत आहेत, ते पाहिल्यास त्यांना आयुष्यभरासाठी जेलमध्ये टाकलं पाहिजे. त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. शरजील थोडंसं काही बोलला तर त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात आली. मोदी सरकार हताश असल्यानं कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतं. मुस्लिमांसोबत मोदी सरकार अन्याय करत आहे. लढाई आता सुरू झाली आहे, असं म्हणत अबू आझमींनी मोदी सरकारला सूचक इशारा दिला आहे.
देश तोडण्याची भाषा करणारा शरजील 'प्रेयसी'मुळे फसला जाळ्यात; 'असा' आखला पोलिसांनी प्लॅन
JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक
शरजील इमाम याला देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिहारमधील जहानाबाद येथून अटक केली होती. दरम्यान, अलीगड आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील चिथावणीखोर भाषणांप्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तपासादरम्यान वसंत कुंज येथील शरजीलच्या भाड्याच्या फ्लॅटमधून एक लॅपटॉप आणि एक संगणक जप्त करण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी सांगितले. दरम्यान, शरजीलने मशिदींमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधाती पत्रके वाटली होती. ज्यामध्ये दिशाभूल करणारे आणि भीती निर्माण करणारे उल्लेख होते. तसेच पोलिसांनी याच्या पत्रकाच्या प्रती जप्त केल्या आहेत. तसेच या प्रतींची झेरॉक्स ज्या दुकानातून काढण्यात आली त्याचीही ओळख पटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.