Join us

‘खटला दोन ते तीन महिन्यांत संपवला असता’

By admin | Published: May 23, 2017 3:35 AM

खटला दोन ते तीन महिन्यांत संपवला असता, अशी प्रतिक्रिया शीना बोरा हत्याप्रकरणाचा खटला चालविणारे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एच. एस. महाजन यांनी त्यांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खटला दोन ते तीन महिन्यांत संपवला असता, अशी प्रतिक्रिया शीना बोरा हत्याप्रकरणाचा खटला चालविणारे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एच. एस. महाजन यांनी त्यांची बदली झाल्यानंतर दिली. त्यांनी नव्या न्यायाधीशांना साहाय्य करा आणि खटला जलदगतीने संपवा, तब्येतीची काळजी घ्या, असेही त्यांनी आरोपींना सांगितले.न्या. एच. एस. महाजन यांची बदली औरंगाबादच्या सत्र न्यायालयात करण्यात आली आहे. शीना बोरा खटला आपल्याकडेच राहिला असता तर दोन ते तीन महिन्यांत तो संपवला असता, असे त्यांनी म्हटले आहे. सोमवारच्या सुनावणीत न्या. महाजन यांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बोलावले व त्यांची बदली झाल्याची माहिती तिन्ही आरोपींना दिली. पुढील सुनावणी १२ जूनपर्यंत तहकूब करत न्या. महाजन यांनी या तिन्ही आरोपींना नव्या न्यायाधीशांना साहाय्य करण्याचे आवाहन केले.काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने छापे मारल्यानंतर पहिल्यांदाच इंद्राणी आणि पीटर न्यायालयात हजर राहिले. आतापर्यंत या केसमध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश दळवी यांनी साक्ष नोंदवली आहे. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेतल्याने दळवी यांची साक्षही अर्धवट नोंदवण्यात आली आहे. २४ एप्र्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या केल्याबद्दल व हत्येचा कट रचल्याबद्दल इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांना सीबीआयने अटक केली. तसेच या खटल्याध्ये इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला ‘सरकारी साक्षीदार’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे.