लोकसभेची आज निवडणूक झाल्यास भाजपा-शिंदे गटाला मोठा धक्का; सर्व्हेक्षण काय सांगतं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:28 AM2023-01-27T08:28:46+5:302023-01-27T08:30:01+5:30

इंडिया टुडे आणि 'सी-वोटर' यांनी संयुक्त विद्यमाने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन' या सर्व्हेक्षणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

If the Lok Sabha elections are held now, the UPA can get 34 seats in Maharashtra, CVoter's survey has revealed. | लोकसभेची आज निवडणूक झाल्यास भाजपा-शिंदे गटाला मोठा धक्का; सर्व्हेक्षण काय सांगतं पाहा...

लोकसभेची आज निवडणूक झाल्यास भाजपा-शिंदे गटाला मोठा धक्का; सर्व्हेक्षण काय सांगतं पाहा...

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई: इंडिया टुडे आणि 'सी-वोटर' यांनी संयुक्त विद्यमाने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन' या सर्व्हेक्षणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या सर्व्हेक्षणात एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत देशातील जनतेचा सध्याचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जानेवारी २०२३ मध्ये गेल्या गेलेल्या या सर्व्हेमध्ये एकूण १ लाख ४० हजार ९१७ जणांनी सहभाग घेतला होता. यात अनेक ज्वलंत मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत.

देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला २८४ जागा, काँग्रेसला ६८ आणि इतर पक्षांना १९१ जागा मिळू शकतात असा अंदाज सर्व्हेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. मतदानच्या टक्केवारीबाबत बोलायचं झालं तर भाजपाला ३९ टक्के, काँग्रेसला २२ टक्के आणि इतर पक्षांच्या खात्यात ३९ टक्के मतदान होऊ शकतं.

लोकसभेच्या आता निवडणूका झाल्यास महाराष्ट्राचा विचार केल्यास या सर्व्हेक्षणातून भाजपा आणि शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेसाठी सी-व्होटरने एक सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास यूपीएला एकूण ४८ जागांपैकी (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी) ३४ जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूण मतदानाच्या ४८ टक्के मतदान यूपीएच्या खात्यात जाऊ शकते. आता निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी  आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून समोर येत आहे. त्यामुळे हा सर्व्हे एनडीएसाठी म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटला मोठा धक्का ठरू शकतो.

'मूड ऑफ द नेशन': देशात आज निवडणूक झाल्यास कुणाचं बनेल सरकार? जनतेचा कौल काय सांगतो वाचा...

एनडीए सरकारच्या कामकाजावर ६७ टक्के लोकांनी खूप चांगला असा शेरा दिला आहे आणि ११ टक्के लोकांनी चांगलं असं म्हटलं आहे. तर १८ टक्के लोकांनी वाईट असा शेरा दिला आहे. कोरोना काळात मोदी सरकारनं केलेलं काम सरकारचं आजवरचं सर्वात मोठं यश मानलं आहे. २० टक्के लोकांनी मोदी सरकार कोरोना लढाईत यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. तर कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला १७ टक्के, राम मंदिराच्या निर्माणाला ११ टक्के आणि जन कल्याण योजनांसाठी ८ टक्के लोकांनी मोदी सरकारचं सर्वात मोठं यश मानलं आहे.

पंतप्रधानपदी कुणाला पाहायला आवडेल यावर आजही जनतेनं नरेंद्र मोदींवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. मोदींच्या नावाला ५२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर १४ टक्के राहुल गांधी, ५ टक्के अरविंद केजरीवाल आणि ३ टक्के लोकांनी अमित शाह यांचं नाव घेतलं आहे. मात्र  वाढती महागाई हे मोदी सरकारचं मोठं अपयश जनतेनं मानलं आहे. यासाठी २५ टक्के लोकांनी महागाईवर मतदान केलं आहे. तर बेरोजगारीच्या मुद्द्याला १७ टक्के, कोरोना महामारीशी झुंज ८ टक्के आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्याला ६ टक्के मतं मिळाली आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: If the Lok Sabha elections are held now, the UPA can get 34 seats in Maharashtra, CVoter's survey has revealed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.