ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळेल तीन दिवसांत बदलून; महावितरणची राज्यभर मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 08:52 AM2023-11-23T08:52:41+5:302023-11-23T08:53:04+5:30

महावितरणची राज्यभर मोहीम सुरू

If the transformer burns out, it can be replaced within three days | ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळेल तीन दिवसांत बदलून; महावितरणची राज्यभर मोहीम

ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळेल तीन दिवसांत बदलून; महावितरणची राज्यभर मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. ज्या भागातील ट्रान्सफॉर्मर जळाला तर त्या भागात विद्युत पुरवठा खंडित होऊन वीजग्राहकांची गैरसोय होते.

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

येथे संपर्क 
साधण्याचे आवाहन 
     वाशी, नेरूळ व पनवेल शहर - ८८७९६२५०१२, 
     ठाणे मंडल स्तरावरील भांडूप, मुलुंड व ठाणे - ८८७९६२५००५
     पेण मंडल स्तरावरील अलिबाग, गोरेगाव, रोहा व पनवेल ग्रामीण - ९०२९११२७७७
या व्हॉट्स ॲप नंबरवर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील कळविता येईल.

ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन दिवसांत ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे.
 

Web Title: If the transformer burns out, it can be replaced within three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.