Join us

फार्महाऊसवरील वॉचमननं तोंड उघडलं तर...; अजित पवार गटाचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 10:40 PM

"जितेंद्र आव्हाड एक विक्षीत माणूस आहेत, त्यांच्या फॉर्महाऊसवरील वॉचमनने जर तोंड उघडलं तर त्यांना महाराष्ट्र सोडून पळून यायची वेळ येईल", असा पलटवार उमेश पाटील यांनी केला.

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. "सुप्रिया सुळेंनी तोंड उघडलं तर अजित पवार यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बाप-लेक आमनेसामने! गजानन किर्तीकरांची घोषणा; अमोल किर्तीकरांविरोधात लढणार

"जितेंद्र आव्हाड एक विक्षीत माणूस आहेत, त्यांच्या फॉर्महाऊसवरील वॉचमनने जर तोंड उघडलं तर त्यांना महाराष्ट्र सोडून पळून यायची वेळ येईल", असा पलटवार उमेश पाटील यांनी केला. आव्हाडांचे फॉर्महाऊसवर एवढे कारनामे आहेत, केलेली आहेत, घडलेली आहेत. तिथल्या लोकांना ते माहित आहे. त्यामुळे विनाकारण आम्हाला तोंड उघण्याची भाषा शिकवू नका, प्रफुल्ल पटेलांनी जर तुमच्या दिल्लीतील कारनाम्यांची बाहेर काढण्यासाठी तोंड उघडलं तर निवडणूक सोडून पळून जायची वेळ येईल, असंही उमेश पाटील म्हणाले.    

आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली." केवळ इर्षा व स्वार्थापोटी अजित पवार हे पंचक्वानाच्या ताटावरून पत्रावळीवर जाऊन बसले, आता मला कोणी वाढतंय का? अशी वाट त्यांना पहावी लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा अजित दादांचे हे उदाहरण कायम लिहिले जाईल", असा निशाणा आव्हाड यांनी साधला. यावर आता अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  

"आव्हाडच सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे"

रविवारी आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी सोमवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढविला आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करीत असल्याचे सांगत, शरद पवारांना त्यांनी विचारावे की २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपाला बिनशर्थ पाठिंबा द्यायला कोणी सांगितला? पहाटेचा शपथविधी कोणाच्या आर्शिवादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठविली गेली, २०२२ मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्याने त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न आव्हाडांनी शरद पवारांना विचारावे असा सल्लाही त्यांनी दिला.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार