अन्याय होत असेल तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:39 AM2023-11-06T10:39:29+5:302023-11-06T10:40:03+5:30

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ वाढवून दिला आहे.

If there is injustice, we have to speak, we have to create terror; Bhujbal's direct opposition to the Maratha certificate | अन्याय होत असेल तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

अन्याय होत असेल तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ वाढवून दिला आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राची मागणी केली आहे, दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभराच दौरा सुरू केला आहे. ओबीसी समाजाने सरसरकट प्रमाणपत्राला विरोध केला आहे. 

'...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा

आज मंत्री छगन भुजळ जालना दौऱ्यावर गेले आहेत, यावेळी त्यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोधा केला. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले,आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, आमचा मराठा आरक्षणाचा विरोध नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. 

"मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आमचा आरक्षणाला विरोध नाही. आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका, ३७५ पेक्षा जास्त जाती आमच्या आहेत. ५४ टक्क्यांपेक्षा जास्त आमचे  गोरगरीब लोक आहेत. मी आज संध्याकाळी या गोष्टी मांडणार आहे. तुम्ही सगळ्यांनी एका आवाजात बोलले पाहिजे, बोलला नाहीत तर मुलांचं भविष्य धोक्यात येणार आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. 

'मला जिथे जिथे जायला येतं तिथे मी जायला तयार आहे, गोरगरिबांच्यावर अन्याय होऊ देणार आहे. वेळ पडली तर सरकारच्या विरोधात बोलायलाही तयार आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. 

Web Title: If there is injustice, we have to speak, we have to create terror; Bhujbal's direct opposition to the Maratha certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.