प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात ...; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांनी उद्योगमंत्र्यांना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:02 PM2023-04-26T14:02:40+5:302023-04-26T14:38:51+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

If there is opposition to this Barsu Refinery project by the locals, it should be understood says Sharad Pawar | प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात ...; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांनी उद्योगमंत्र्यांना दिला सल्ला

प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात ...; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांनी उद्योगमंत्र्यांना दिला सल्ला

googlenewsNext

मुंबई- गेल्या काही दिवसापासून कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकल्पाला विरोध सुरू आहे. काल या प्रकल्पा संदर्भात आंदोलन झाले. या प्रकल्पा संदर्भात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेलतर तो समजून घ्यावा. विरोधाची कारणं लक्षात घेऊन मार्ग काढावा, असा सल्ला शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. 

महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, नाना पटोले यांची उघड भूमिका

खासदार शरद पवार म्हणाले, आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, काल पोलीस दलाने केलेली कारवाई थांबवली आहे. आता तिथे जमिनीची तपासणी असण्याच कमा सुरू आहे. आता ही गोष्ट लोकांना समजावून सांगितली आहे, त्यामुळे लोकांचा विरोध थांबला आहे. 

मी सामंतांना सांगितलं की, तुम्ही असी घाई करु नका. विरोधक आणि अधिकाऱ्यांची बैठक घ्या. यातून काय निष्पन्न होतंय ते बघा.आणि काही प्रश्न असतील तर मार्ग काढा. जर लोकांचा जास्त विरोध असेल तर काही मार्ग कसा निघेल तो बघा. यासाठी दुसरी जागा असेलतर विचार व्हावा, असंही शरद पवार म्हणाले. 

Web Title: If there is opposition to this Barsu Refinery project by the locals, it should be understood says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.