नितीन जगताप
मुंबई : रेल्वेला कित्येकदा उशीर होतो; पण प्रवाशांना स्थानकातच ताटकळत बसावे लागते. या प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकात आरामाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
आयआरसीटीसी मध्य रेल्वेमार्गावर स्लीपिंग पॉड उभारणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) हे भारतातील स्लीपिंग पॉड असणारे पहिले स्थानक ठरणार आहे. या स्लीपिंग पॉडसाठी रेल्वेकडून शुल्क आकारले जाणार आहे. या नव्या सुविधेच्या घाेषणेचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.
सीएसएमटी येथे ३२ पॉडसीएसएमटी आणि एलटीटी येथे लहान स्लीपिंग पॉड उभारले जाणार आहेत. ज्या प्रवाशांची गाडी सुटण्यास उशीर आहे किंवा त्यांना डुलकी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी ही सोय असणार आहे. सीएसएमटी येथे ३२ आणि एलटीटी येथे ४८ स्लीपिंग पॉड तयार करण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या सोयीसुविधांमुळे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
कोणत्या सुविधा मिळणार आहेत?वायफायवातानुकूलितप्रवेशासाठी आधुनिक कार्डसुविधायुक्त स्वच्छतागृहसीसीटीव्ही निगराणी
प्रवाशांना रेल्वेस्थानकात आराम करण्यासाठी सीएसएमटी आणि एलटीटी येथे स्लीपिंग पॉड उभारले जाणार आहे. याबाबतची निविदा काढण्यात आली आहे. - शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे