वाहनाचा विमा न काढल्यास वाहन होणार जप्त- दिवाकर रावते 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 04:16 PM2018-12-31T16:16:21+5:302018-12-31T16:37:04+5:30

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाहन चालकांना कडक इशारा दिला आहे.

If the vehicle is not insured, the vehicle will be seized - diwakar raote | वाहनाचा विमा न काढल्यास वाहन होणार जप्त- दिवाकर रावते 

वाहनाचा विमा न काढल्यास वाहन होणार जप्त- दिवाकर रावते 

Next

मुंबई- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाहन चालकांना कडक इशारा दिला आहे. वाहनाचा विमा न काढल्यास वाहन जप्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्यावर सहा महिन्यांसाठी परवाना रद्द होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. परिवहन आणि वाहतूक पोलिसांची आज एक बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्यात आला असला तरी देशभरातील तब्बल 50 टक्के वाहने अद्याप या विम्याने सुरक्षित नाहीत. त्यामुळे थर्ड पार्टी विम्यासंबंधी नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं राज्य सरकारानं दिले आहेत.

थर्ड पार्टी विम्याची रक्कम पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी ट्रकमालकांच्या संघटनेने सरकारकडे केली होती. याबाबत रास्त निर्णय घेतला जाईल, असे सरकारने या संघटनेला आश्वासन दिले होते. दुचाकी विक्रीची सर्वांत मोठी बाजारपेठ ही भारतात आहे. डिजिटल मंचावरूनही आता विमा उपलब्ध होतो. चालू वर्षात 60 टक्के भारतीयांनी मुदत संपलेल्या पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी ऑनलाइन दुचाकी विमा पॉलिसीचा पर्याय निवडल्याचंही एका सर्वेक्षणातून समोर आलं होतं. भारतात ऑनलाइन दुचाकी विमा पॉलिसी घेणाऱ्या 10 लाखांहून अधिक ग्राहकांनी केलेल्या व्यवहारांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

Web Title: If the vehicle is not insured, the vehicle will be seized - diwakar raote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.