महिला मतदारांत जागृती झाली, तरच महिलांचे नेतृत्त्व वाढेल; अतिथी संपादक नीलम गोऱ्हेंची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 02:03 AM2020-03-09T02:03:26+5:302020-03-09T02:04:32+5:30

महिला सक्षमीकरण-शाश्वत विकासावर स्थानिक स्वराज्य संस्थांतही विचारमंथन गरजेचे

if women voters get an awareness, women leadership will increase! - Guest Editor Neelam Gorhe | महिला मतदारांत जागृती झाली, तरच महिलांचे नेतृत्त्व वाढेल; अतिथी संपादक नीलम गोऱ्हेंची भूमिका

महिला मतदारांत जागृती झाली, तरच महिलांचे नेतृत्त्व वाढेल; अतिथी संपादक नीलम गोऱ्हेंची भूमिका

googlenewsNext

मुंबई : राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवायचे असेल; तर महिला मतदारांत जागृती यायला हवी. शिवाय, गप्प बसणारी, प्रतिकार न करणारी महिला चांगली आणि बोलणारी, जोरकसपणे भूमिका मांडणारी, प्रतिवाद करणारी महिला वाईट ही आपली सामाजिक व्याख्याच आता बदलण्याची वेळ आली असल्याचे परखड मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी रविवारी मांडले.
जागतिक महिला दिनानिमित्तलोकमत’च्या अतिथी संपादक म्हणून संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर भूमिका मांडली. मुंबईसोबतच दिल्ली, औरंगाबाद, अकोला, नाशिक, पुणे, नागपूर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडल्या गेलेल्या ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांसोबतच राज्यातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी त्यांनी मनमोकळी चर्चा केली.

राजकारणातील, खास करून विधिमंडळ- संसदेतील महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यास आरक्षणाचा प्रश्न विचारल्यावर गोºहे म्हणाल्या, जेव्हा महिला मतदार म्हणून जागृत होतील तेव्हाच महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल. राजकीय पक्षांतील मतभिन्नता आणि आरक्षणाच्या प्रश्नावर सुरूवात कोणी करायची, यावरून हा मुद्दा १९९६ पासून प्रलंबित आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा आणि विधानसभेत महिलांची संख्या वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. राजकारणात तीव्र स्पर्धेला पर्याय नाही. चारित्र्यहनन, हिंसाचाराची भीती आणि आर्थिक कारणांमुळे महिला राजकारणात पुरेशा प्रमाणात येत नसल्याचे विविध अभ्यासातून समोर आल्याचा दाखला त्यांनी दिला. शिवाय, प्रतिकार न करता सहमतीची मान डोलावणारी स्त्रीच चांगली, अशी आपल्याकडे एक सामाजिक व्याख्या आहे. अशी अलिखित व्याख्याच बदलायची वेळ आल्याचे मत त्यांनी स्पष्टपणे नोंदवले.

महिलांना आरक्षण दिले गेले, तेव्हा महिलांचीही व्होट बँक तयार करावी का, असा विचार केला होता़ मात्र ही सौदेबाजी ठरेल़ म्हणून ते माध्यम न वापरता स्त्री आणि पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न आम्ही सुरू केला. आरक्षणामुळे राजकीय क्षेत्रात महिलांची संख्यात्मक ताकद वाढली. घराणेशाहीतून राजकारणात आलेल्या महिलांची संख्या २५ टक्के असेल़ पण राजकीय आधार नसलेल्या कार्यकर्त्यांनाही आरक्षणामुळे चेहरा मिळाला़ महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांत विचारमंथन गरजेचे असल्याचे मत गोºहे यांनी व्यक्त केले़

महिलांमधील व्यसनाधीनता पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, शिक्षण संस्थांमध्ये रेव्ह पार्टीचे फॅड आहे़ सॉफ्ट ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळून मुलींना देण्याचे प्रकारही घडतात़ त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीत तीन गोष्टी प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये असाव्या़, असे ठरविण्यात आले. कॉलेज कॅम्पस रॅगिंगमुक्त करण्याची गरज आहे़ तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये विशाखा समित्यांची नियुक्ती करण्यात यावी़, याचा आग्रह; व्यसनमुक्तीसाठी हेल्पलाईन असल्यास विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देणे शक्य होईल़

स्त्री अभ्यास केंद्राच्या बाजूने विचार होताना दिसत नाही, असे निर्मला जाधव यांनी निदर्शनास आणून दिल्यावर डॉ़ गोºहे यांनी अभ्यास केंद्राना निधीसाठी वेळोवेळी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले़ अभ्यास केंद्रांच्या बैठका घेऊन, प्रश्न समजून त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी तत्काळ दिले. लिंगभेद समानतेच्या भावनेसाठी आतापर्यंत चार हजार शिक्षकांच्या समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले़ महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. यावर सरकारी पातळीवर नियोजन सुरु असून पेट्रोल पंपावरील स्वच्छतागहे सर्व महिलांसाठी खुली केल्याचे त्यांनी सांगितले़ असे स्वच्छतागृह उपलब्ध करुन न देणाºया पेट्रोल पंपांची तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले़

स्त्रियांवरील वाढते हल्ले थांबविण्यासाठी कुठली पावले उचलण्यात येत आहेत, असा प्रश्न नाशिकच्या दंतचिकित्सक डॉ़ स्वाती करकरे यांनी विचारला़ त्यावर एकतर्फी प्रेमातून असे हल्ले होण्याचे प्रमाण अधिक आहे. एकतर्फी प्रेमातून होणाºया हत्यांबाबत आम्ही काम करत आहोत. प्रेमातून होणाºया हिंसेचे मोठ्या प्रमाणात उद्दात्तीकरण होताना दिसते. मात्र या विषयावर मुलांशी बोलणारे कोणी नाही. माझी बायको सर्वांना सांभाळून घेणारी असावी; मात्र ती आधुनिक नको अशा द्वंद्वात ही मुले सापडलेली दिसतात. शिवाय, जातीसंस्था एवढी घट्ट आहे, की संपूर्ण समाजाच्या विरोधात त्यांना उभे रहावे लागते. त्यामुळे याबाबत आपल्यालाच विचार करायला हवा.



पर्यटन संधीसाठी आदित्य यांच्याशी चर्चा
पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांना प्रोत्साहनासाठी सरकारी पातळीवर काय मदत मिळू शकेल, असे नागपूरमधील महिला उद्योजक धनश्री गंधारे यांनी विचारताच महिला उद्योजकांना प्रोत्साहनासाठी गेल्या वर्षी धोरण जाहीर झाल्याचे गोºहे यांनी निदर्शनास आणले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधून महिला उद्योजकांना संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

हा तर माझा सन्माऩ़़!
अतिथी संपादकपदाची जबाबदारी सोपवून ‘लोकमत’ने महिला कार्यकर्ता ते विधान परिषदेच्या उपसभापतीपर्यंतच्या माझ्या कार्याचा सन्मान केला आहे. आम्ही बोलतो, मात्र आमचा आवाज कोणी ऐकत नाही, अशी खंत शंभर वर्षापूर्वी झालेल्या महिला अधिवेशनात पंडिता रमाबाई रानडे यांनी व्यक्त केली होती़ मात्र ‘लोकमत’ आमचा आवाज ऐकतो, असे मी आज ठामपणे सांगेऩ असे सहकार्य नेहमी मिळो, हीच इच्छा असल्याची भावना उपसभापती नीलम गोºहे यांनी व्यक्त केली.

Web Title: if women voters get an awareness, women leadership will increase! - Guest Editor Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.