मुंबई - अंबरनाथमध्ये आइस्क्रीममध्ये झुरळ आणि वडापावमध्ये पाल सापडल्याची घटना ताजी असतानाच मुलुंडमध्ये पाणीपुरीत अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एक तरुणीला मुलुंडच्या खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खात असताना तिला पाणीपुरीत अऴी आढळून आले. यानंतर तिने पाणीपुरी बनविण्याचा सामान तपासले असता पाणीपुरीच्या पाण्यातही अळ्या आढळून आल्या. यासंदर्भात संबंधित पाणीपुरीवाल्यांच्या विरोधात नागरिकांनी टी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्याकडे तक्रार केली. परंतु, तरीही पाणीपुरीवाला आपला ठेला लावत असल्यामुऴे नागरिकांनी पुढाकार घेत या परिसरात पाणीपुरी खाऊ नये असं आवाहन करणारे बॅनर्स लावले. दरम्यान, पालिकेच्या उदासीन भूमिकेवर नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
पाणीपुरी खात असाल तर जरा जपूनच, पाणीपुरीच्या पाण्यात सापडल्या अळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 7:54 PM