अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:24 AM2024-09-21T04:24:44+5:302024-09-21T04:25:31+5:30
आयटीएमएसची चाचणी पूर्ण झाल्यावर या प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मुंबई : अटल सेतूवर लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात परिवहन विभागाद्वारे या यंत्रणेची चाचणी केली जाणार असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. आयटीएमएसची चाचणी पूर्ण झाल्यावर या प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
अटल सेतूवर ३७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये ‘इन्सिडेंट डिटेक्शन’ प्रणाली आहे, जी वाहनांचा वेग मोजू शकते. तसेच हे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान असलेले कॅमेरे असून वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधण्यात मदत करतील. परिवहन विभागाने या यंत्रणेची चाचणी न केल्यामुळे तिचा वापर करून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांना चलन जारी करण्यात येत नव्हते. या प्रणालीच्या माध्यमातून फास्ट टॅग वैध नसणाऱ्या वाहनांवर चलन जारी केले जात होते. परंतु यंत्रणेची चाचणी पूर्ण झाल्यावर वाहनचालकांनी नियम मोडल्यास तत्काळ चलन जारी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
३७४ कॅमेरे आणि त्यांची वैशिष्ट्ये
१३ सीसीटीव्ही पाळत ठेवणारी यंत्रणा
३६ अंडर ब्रिज सर्व्हिलन्स सिस्टम
१९ कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित व्हिडिओ कॅमेरे
६ आपत्कालीन कॉलिंग बॉक्स
१२ सेक्शन स्पीड कॅमेरे
आयटीएमएस
प्रणालीचे घटक
nसीसीटीव्ही कॅमेरे आणि सेंसर्स
nरेड लाइट वायलेशन डिटेक्शन
nस्पीड डिटेक्शन
nस्वयंचलित दंड प्रणाली
nवाहतूक मॉनिटरिंग आणि मार्ग नियोजन प्रणाली