Join us

‘पालकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल तर राजीनामा द्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 7:33 AM

पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री असमर्थ असतील, पालकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी त्यांना वेळ नसेल आणि मुजोर शाळांच्या शुल्कवाढीविरोधात कारवाई करू शकणार नसतील, तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा

मुंबई  - पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री असमर्थ असतील, पालकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी त्यांना वेळ नसेल आणि मुजोर शाळांच्या शुल्कवाढीविरोधात कारवाई करू शकणार नसतील, तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आक्रमक झालेल्या पालक संघटनांनी केली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील अनेक पालक व पालक संघटनांनी शनिवारी शिवसेना भवन व शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक दिली. मात्र, त्यांना संबंधित भेटले नाहीत.शुल्क अधिनियम कायद्यात आवश्यकतेनुसार बदल, शाळांचे ऑडिट, शुल्कात ३० टक्के कपात अशा प्रमुख मागण्यांसाठी पालकांनी हा मोर्चा काढला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिल्ली दौऱ्यावर असल्याने पालक, पालक संघटनांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. मात्र, राज्याचे (पान १० वर)

टॅग्स :शिक्षण