मुंबई : निरपराध हिंदूंच्या लागोपाठ चालू असलेल्या अटकसत्रामुळे काही हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि साधक यांच्यामध्ये ‘अशाच प्रकारे चुकीची अटक माझीही होऊ शकते’, अशी नाहक भीती वाटत असल्यास साधकांनी नामजप आणि प्रार्थना यांचे प्रमाण वाढवावे, असा उपदेश सनातन प्रभात या मुखपत्रातून करण्यात आला आहे.नामजप करताना कुलदेवता किंवा भगवान श्रीकृष्ण यापैकी अधिक श्रद्धा असलेल्या कोणत्याही एका देवतेचा किंवा दोन्ही देवतांचे जप करण्याची इच्छा असल्यास अर्धा-अर्धा वेळ विभागून नामजप करावेत. नामजपासमवेत मनातील विचार किंवा भीती यानुसारअधूनमधून प्रार्थनाही करावी. या व्यतिरिक्त अन्य कोणती उपासना करत असल्यास ती करावी, असेही सांगण्यात आले आहे.
अटक होण्याची नाहक भीती वाटत असल्यास नामजप, प्रार्थना करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:12 AM