हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:07 AM2021-02-08T04:07:18+5:302021-02-08T04:07:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय ...

If you have the courage, show it to Karnavati of Ahmedabad | हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा

हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ''अहमदाबाद''चे नामांतर ''कर्णावती'' करून दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले.

शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने शिवसेनेच्या मालाड येथे झालेल्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, असे सांगून हेमराज शाह म्हणाले की, ''अहमदाबाद''ला कर्णावती हे नाव आहे. परंतु, रीतसर ''कर्णावती'' हे नाव सरकारदरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबाद ला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नावालासुद्धा एक इतिहास आहे. मग, परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नावे देण्यात हरकत काय आहे, असा सवाल त्यांनी केला.

महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार म्हणजेच शिवशाही सरकार १९९५ साली आल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले. परंतु, काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नावे अंमलात येऊ शकली नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहीत असूनही निव्वळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणण्यात येत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

२०१४ पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करू शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ''भारतरत्न'' किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत ''अब समय आ गया है !'' असे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आवर्जून सांगतात. परंतु, ती वेळ अजूनही आलेली नाही. पर्यायाने ते होऊ शकलेले नाही. आज देशात लाखो शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असताना, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि ''सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'' या केवळ घोषणा न राहता त्या अमलात कशा येतील, त्यासाठी प्रयत्न करा. औरंगाबाद, उस्मानाबाद याबरोबरच अहमदाबादचे नामांतर करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या, ब्रिटिशांच्या खुणा, आठवणी पुसून काढाव्यात, असे कळकळीचे आवाहनही हेमराज शाह यांनी शेवटी केलेे.

----------------------------------------

Web Title: If you have the courage, show it to Karnavati of Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.