हिंमत असेल तर विधानसभा बॅलेट पेपरवर घ्या; विरोधकांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 05:00 AM2019-07-02T05:00:58+5:302019-07-02T05:05:02+5:30

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी महसूल, नगरविकास, महिला बालकल्याण, पर्यटन, किमान कौश्यल्य विकास, गृह अशा विविध खात्यातील भ्रष्टाचार कागदपत्रांसह सभागृहात मांडला.

If you have the courage, take it on the assembly ballot paper; Opponent Challenge | हिंमत असेल तर विधानसभा बॅलेट पेपरवर घ्या; विरोधकांचे आव्हान

हिंमत असेल तर विधानसभा बॅलेट पेपरवर घ्या; विरोधकांचे आव्हान

Next

मुंबई : राज्यातील जनता तुमच्या सोबत आहे असा तुमचा दावा आहे. मग हिंमत असेल तर विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा ठराव मांडा, असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला दिले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी महसूल, नगरविकास, महिला बालकल्याण, पर्यटन, किमान कौश्यल्य विकास, गृह अशा विविध खात्यातील भ्रष्टाचार कागदपत्रांसह सभागृहात मांडला. मुख्यमंत्र्यांनी यावर मुद्देसुद उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जयंत पाटील म्हणाले, मीराभाईंदर नगरपालिका हद्दीतील सेव्हन इलेव्हन हॉटेलच्या मालकाने कांदळवनात सीआरझेडचे उल्लंघन केले. हायकोर्टाच्या आदेशाच्या अवमानाचे प्रकरण असताना हॉटेलला बांधकाम करण्यास महापालिकेने परवानगी दिली व तक्रार ती रद्द केली. मात्र नगरविकास खात्याने स्टेट हायवे जात असल्याचे दाखवत हॉटेलला पुन्हा परवानगी दिली. त्यानंतर हॉटेल मालकाने क्लब बांधला. या परवानगी पत्रावर स्वत: मुख्यमंत्र्यांची सही आहे. कांदळवन नष्ट केले म्हणून ६ गुन्हे संबंधितांवर दाखल झाले; मग कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल पाटील यांनी केला. भाजपाचे नेते नरेंद्र मेहता यांच्या बंधूंचे हे हॉटेल आहे.
माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याबद्दलचा लोकायुक्ताचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी दडवून ठेवला. एसआरए प्रकल्पात प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या दर्शन डेव्हलपर्स या कंपनीने सत्ताधारी पक्षाला काही कोटी रुपयांचा निधी दिला. त्याच कंपनीला मेहतांनी मदत केली. याचीही चौकशी व्हायला हवी, अशीही मागणी पाटील यांनी केली. अंधेरीतील आशिष एन्टरप्रायजेस, परीणी एन्टरप्रायजेस या विकासकांनी मुद्रांक शुल्कच भरले नाही व सरकारचे ८० कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला. शिवडी येथील अभ्यूदय गृहनिर्माण संस्थेतही भ्रष्टाचार झाला. रुस्तमजीसह अन्य तीन कंपन्यांनी सरकारचा ५११ कोटीचा कॉर्पस फंड बुडवला. सरकारचे ८१ कोटी रुपये बुडवले. रुस्तमजी सरकारचा जावई आहे की काय? रुस्तमजी नाव आले की सर्वजण त्यांच्यासमोर पायघड्या घालतात, असेही ते म्हणाले.

बिल्डरांना आंदण
धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याआधी राज्याच्या क्रीडा विभागाकडून चालवले जायचे मात्र या सरकारच्या काळात ते बिल्डरांना आंदण दिले आहे. या कंपनीचे मालक सुरज सावंत कोण आहेत? सरकार यांच्यावर इतके मेहरबान का आहे? असा सवालही सरकारला केला.

Web Title: If you have the courage, take it on the assembly ballot paper; Opponent Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.